Kolkata crime news in marathi-41-yr-old kills wife-finishes chores-makes food for kids-shocking-incident esakal
देश

Crime News : आधी पत्नीची केली हत्या नंतर मुलांसाठी बनवलं जेवण अन्....भयानक हत्याकांड!

Crime News : आज 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. मात्र आजही महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहेत, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. महिला दिनी कितीही प्रसिद्धी किंवा स्त्रीशक्तीवर कितीही भाषणे झाली तरी परिस्थितीत फारसा बदल न होण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार.

Sandip Kapde

Crime News:

आज 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. मात्र आजही महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहेत, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. महिला दिनी कितीही प्रसिद्धी किंवा स्त्रीशक्तीवर कितीही भाषणे झाली तरी परिस्थितीत फारसा बदल न होण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार.

आज कोलकातामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर काटा येईल अशी ही घटना आहे. 41 वर्षांच्या नवऱ्याने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर घरातील कामे केली, मुलांसाठी जेवण बनवले. मुलांनी टिवशनला पाठवले नंतर 100 नंबरवर कॉल करुन पोलिसांना माहिती दिली.

आधी पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आला, त्यानंतर पतीने 100 नंबर डायल करून पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण केले. पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी मृत पत्नीच्या जवळच होता. गुरुवारी ही घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव कृष्णा दास असे आहे. पोलिसांनी पोहोचून आरोपी पती कार्तिक दासला अटक केली. माहिती मिळताच कोलकाता पोलिसांच्या होमिसाईड विभागाचे गुप्तहेर घटनास्थळी गेले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजी बेहाला येथील वॉर्ड क्रमांक 121 मधील सुकांता पल्ली येथे कार्तिक दास भाड्याने राहतो. कार्तिक दास या कोंबड्यांचा व्यवसाय आहे.  त्याला 5 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा आहे. हत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी शेजाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. (Crime news)

जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांना कार्तिक पत्नी संपत्तीच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसलेला दिसला. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने तिला मारल्याचे पुन्हा सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून या जोडप्यामध्ये अनेकदा भांडणे होत असत. बुधवारीही उशिरा त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात कार्तिकने कृष्णाचा गळा दाबला, असे पोलिसांनी सांगितले. त्याने दावा केला की त्याने मुलांना सांगितले होते की त्यांची आई अचानक आजारी पडली होती आणि ती झोपली होती.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने पोलिस चौकशीत सांगितले की, बुधवारी रात्री त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने 100 नंबर डायल करून स्वतः पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन आरोपीला अटक केली. कोलकाता पोलिसांच्या होमिसाईड विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल.

कोलकाता पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्तिकचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. तसेच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दाम्पत्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार्तिकने पत्नीची हत्या का केली, त्यांच्यात काही मतभेद होते का, या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे. पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT