IPL 2024 Dinesh Karthik : निवृत्तीच्या शक्यतेनंतर कार्तिकने आरसीबीला अजून एक दिला धक्का

Dinesh Karthik
Dinesh Karthik esakal

Dinesh Karthik Injury Miss 2 IPL 2024 Matches : आयपीएलमधील सर्वात धोकादायक फिनिशरपैकी एक असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दिनेश कार्तिक आयपीएल 2024 नंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, परंतु आता तो आरसीबीच्या सलामीच्या सामन्यातही मैदानात उतरणार नाही. कार्तिक दुखापतीमुळे किमान दोन सामन्यांतून बाहेर असेल.

Dinesh Karthik
Ravichandran Ashwin Wife : आश्चर्य, धक्का अन् बरच काही... अश्विनची पत्नी प्रितीने सांगितला लग्नावेळीचा किस्सा

दिनेश कार्तिक हा 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामापासून खेळतोय. धोनीप्रमाणे तो देखील सर्वात जुना आयपीएल खेळाडू आहे. तो आतापर्यंतच्या 16 हंगामात फक्त दोन सामन्यात खेळला नव्हता. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुासर दिनेश कार्तिकचे IPL 2024 हे शेवटचे आयपीएल सत्र असणार आहे. या आयपीएल हंगामानंतर दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.

Dinesh Karthik
Ravichandran Ashwin Wife : आश्चर्य, धक्का अन् बरच काही... अश्विनची पत्नी प्रितीने सांगितला लग्नावेळीचा किस्सा

दिनेश कार्तिक आतापर्यंत 6 आयपीएल फ्रेंचायजींकडून आयपीएल खेळला आहे. तो 2008 ते 2011 पर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. त्यानंतर 2012 पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि 13 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला.

2014 मध्ये तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडे गेला. एका हंगामानंतर त्याने 2015 मध्ये आरसीबीचा रस्ता धरला. मात्र तिथेही कार्तिक एक हंगामच टिकला. 2016-7 गुजरात लायन्समध्ये काढल्यानंतर त्याने केकेआरचा संघ जवळ केला. तेथे तो कर्णधार देखील होता. मात्र 2022 मध्ये केकेआरने त्याला रिलीज केलं अन् तो पुन्हा आरसीबीवासी झाली.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com