Mamata Banerjee esakal
देश

पश्चिम बंगाल सरकारला उच्च न्यायालयाचा दणका, 'या' प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड

उच्च न्यायालयाने आता सीबीआयला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Manoj Bhalerao

Kolkata High Court:कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगाल सरकारला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडीकडे सोपवण्यात अपयश आल्याने पश्चिम बंगाल सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आता सीबीआयला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय प्रकरण आहे

पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील एका महिला सहकारी संस्थेवर ५० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर महिला सहकारी संस्थेने 2020 मध्ये काम करणं बंद केलं. ज्या व्यक्तीने पैसे जमा केले त्या व्यक्तीने लोकांचे पैसे परत केले नसल्याचा आरोप आहे. त्यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय आणि ईडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते.(Latest Marathi News)

न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते, परंतु बंगाल सरकार तसं करण्यात अपयशी ठरलं, त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला दंड ठोठावला.

दंडाची रक्कम दोन आठवड्यांत हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे तीन दिवसांत सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT