Students aggressive protest 
देश

Kolkata Nabbana March: हावडा ब्रिजवर विद्यार्थ्यांचे उग्र आंदोलन; दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

Kolkata Nabbana March Students aggressive protest: हावडा ब्रिजवरून पुढे येऊ पाहणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर वॉटर कॅननचा मारा करण्यात येत आहे. असे असताना विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

कार्तिक पुजारी

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. हावडा ब्रिजवरून पुढे येऊ पाहणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर वॉटर कॅननचा मारा करण्यात येत आहे. असे असताना विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

हावडा ब्रिजला बंद करण्यात आले आहे. ब्रिजवर लोखंडाचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचं देखील पाहायला मिळालं. आतापर्यंत अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंदोलकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडली आहे. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पोलीस आंदोलनकर्त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

आंदोलनामध्ये अनेक कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, राजकारणाशी त्यांना काही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजीनामा हवा आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी नबन्ना आंदोलन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. अभयाला न्याय, दोषीला मृत्यूची शिक्षा आणि ममता बॅनर्जी यांचा राजीनामा.

कोलकात्यामधील आर जी कार मेडिकल मध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सध्या या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT