Kolkata RG Kar Murder Case Esakal
देश

Kolkata Case: कोलकाता बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये! पीडितेचे नाव अन् फोटो सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश

Kolkata Case Updates: यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने निपुन सक्सेना खटल्याच्या निकालात निकालात असे निर्देश दिले होते की, बलात्कार पीडितांची ओळख उघड न करणे आवश्यक आहे.

आशुतोष मसगौंडे

कोलकात्याच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी एका 31 वर्षीय महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

आशात आता सर्वोच्च न्यायालयाने या पीडित डॉक्टरची छायाचित्रे, व्हिडिओ आणि नाव सोशल मीडिया तसेच बातम्यांमधून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या प्रकरणी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पीडित तरुणीचे नाव, छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याची मागणी केली होती. यावर सर न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायाधीश जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

याचिकाकर्त्यांनी यावेळी निपुन सक्सेना यांच्या खटल्याचा दाखला दिला. निपुन सक्सेना खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रकाशित करणे अयोग्य ठरवले होते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने निपुन सक्सेना खटल्याच्या निकालात निकालात असे निर्देश दिले होते की, बलात्कार पीडितांची ओळख उघड न करणे आवश्यक आहे.

दरम्यान काल सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्या मृत व्यक्तीवर प्राणघातक हल्ला आणि खून करण्यात आला आहे, त्या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप्सही सर्व मीडियावर आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे."

निपुण सक्सेना खटल्यातील 2018 च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, "कोणतीही व्यक्ती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया इत्यादींवर पीडितेचे नाव छापू किंवा प्रकाशित करू शकत नाही किंवा दूरस्थ पद्धतीनेही असे कोणतेही तथ्य उघड करू शकत नाही ज्यामुळे पीडितेची ओळख लोकांना कळू शकते."

9 ऑगस्ट रोजी, प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा गंभीर जखमांच्या खुणा असलेला मृतदेह, रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, कोलकाता पोलिसांनी एका आरोपीला कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक केली. दरम्यान ही घटना घडल्यापासून देशात मोठ्या प्रमाणात संताप उसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT