देश

Kota Crime:तिला डॉक्टर व्हायचं होतं ! कोटा शहरात कँटीन कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर दारु पाजून अत्याचार

NEET Aspirant Physical Assault:कोटा शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कँटीनमधील कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आला.

Manoj Bhalerao

Crime Against Minor Girl:भारतात जेव्हा एखादा विद्यार्थी मनाशी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायची इच्छा बाळगतो, तेव्हा या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्याच्या तोंडावर पहिलं नाव असतं ते म्हणजे 'कोटा फॅक्टरी'चं म्हणजेच कोटा शहराचं. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नीट आणि जेईई स्पर्धांच्या तयारीसाठी कोटाची वाट धरतात. मात्र, डॉक्टर बनण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना या कोटा शहरात घडली आहे.

नीट परीक्षेच्या तयारीसाठी कोटा शहरात आलेल्या १५ वर्षीय विद्यार्थीनीवर होस्टेल कर्मचाऱ्याकडून बलात्कार कऱण्यात आला आहे. होस्टेलमध्ये काम करणाऱ्या एका २२ वर्षीय कर्मचाऱ्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. या प्रकरणात होस्टेल कर्मचारी आणि होस्टेल मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस अधिक्षक शरद चौधरी म्हणाले की २२ वर्षीय कर्मचारी आणि होस्टेल मालकाला मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली. पीडित मुलीने मंगळवारी (दि. १० ऑक्टोबर) कँटीन कर्मचाऱ्याविऱोधात तक्रार नोंदवली. यात त्या मुलीने आरोप केला की फेब्रुवारी महिन्यात या कर्मचाऱ्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

पीडित मुलगी मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोटा शहरात आली होती. त्यानंतर तिने एका होस्टेलमध्ये प्रवेश घेतला. आरोपी या होस्टेलमध्ये कँटीनमध्ये काम करायचा आणि तिला दररोज जेवण वाढायचा. फेब्रुवारी महिन्यात या युवकाने तिला बळजबरीने दारु पाजली आणि त्यानंतर तिला दुसऱ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केलाय. याबद्दल तपास अधिकारी वासुदेव सिंह यांनी माहिती दिली. आरोपीने या काळात ६ वेळा तिच्यावर अत्याचार केला आणि त्यांचं चित्रीकरण करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.(Latest Marathi News)

पोलिस अधिक्षक सिंग म्हणाले की,या अत्याचाराची तक्रार तिने सुरुवातीला होस्टेल मालकाला केली आणि त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. याउलट, होस्टेल मालकाने तिला त्या मुलाशी लग्न करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला की जर ही गोष्ट बाहेर समजली, तर तुझ्या घरच्यांची इज्जत धुळीस मिळेल. त्यानंतर होस्टेल मालकाने ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.

मुख्य आरोपी आणि होस्टेल मालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६-२, ३६३ , ३६६ अ, ३६८, ५०४, ५०६, ३४१, ३२३ आणि POCSO आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT