Krishna Kumari Rai 
देश

पती मुख्यमंत्री बनला अन् पत्नीचा दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा; राज्यात मोठी घडामोड!

Krishna Kumari Rai resigned News: कृष्णा कुमारी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार बिमल राय यांचा नामची-सिंघीथांग मतदारसंघातून पराभव केला होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तमांग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, त्यानंतर एका दिवसाने त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कृष्णा कुमारी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार बिमल राय यांचा नामची-सिंघीथांग मतदारसंघातून पराभव केला होता. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला देखील आहे. तमांग यांच्या सिक्किम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या होत्या. तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत होत्या.

कृष्णा कुमारी यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना पत्र लिहिले आहे. यात त्या म्हणाल्या आहेत की, त्यांनी पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करून निवडणूक लढवली होती. ''मोठ्या दु:खी मनाने मी सांगत आहे की मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मी कधीही विचार केला नव्हता की, मी इतक्या लवकर राजकारणात येईन. मी राजकारणाला नेहमी समाजकारण म्हणून पाहिलं आहे. पार्टी अध्यक्षांनी निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्याने मी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.''

लोकांची सेवा करण्यासाठी मला कोणत्याही पदावर राहण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या क्षमतेनुसार मदत करत आली आहे आणि करत राहणार आहे. मी आणि माननीय मुख्यमंत्री नामची सिंगिथांग मतदारसंघासाठी योग्य उमेदवार देऊ, जो लोकांची सेवा करेल, असं कृष्णा कुमारी म्हणाल्या आहेत. कृष्णा कुमारी यांनी यावेळी मुख्यमंत्री पती तमांग यांचे कौतुक देखील केले आहे. मला विश्वास आहे की, तमांग यांच्या नेतृत्त्वात सिक्किम प्रगती आणि विकास साध्य करेल, असं त्या म्हणाल्या.

पत्नीच्या या निर्णयानंतर तमांग यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'माझ्या पत्नीच्या राजीनाम्याच्या संदर्भात सिक्किमच्या जनतेला सांगू इच्छितो की, कृष्णा कुमारी यांनी पक्षाचे कल्याण आणि उद्देश यांची प्राथमिकता लक्षात घेऊन पक्षाच्या सर्वानुमते आमदारकीचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतलाय. मतदारसंघासाठी एका समर्पित उमेदवाराची निवड केली जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर, इचलकरंजीत आज एकच धुमशान

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी; AQI 375 वर पोहोचला

नवऱ्याच्या अफेअरची कुणकुण; पत्नीकडून हॉटेल रूममध्ये रंगेहात पकडले गेलेले कमल हासन; अभिनेत्रीचं नाव ऐकून बसेल धक्का

Maharashtra Biodiversity : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत भर; दख्खन पठारावर प्रथमच दुर्मीळ पतंगांची नोंद, विदर्भातील संशोधकांच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT