Bus Accident esakal
देश

प्रवाशांचा बस अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार तब्बल 10 लाख रुपये; परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय

भरपाई रक्कम ३ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

शक्ती योजनेंतर्गत महिला प्रवाशांच्या तिकीट रकमेवर १ रुपये भरपाई निधी शुल्क घेण्यात येणार नाही. सदर रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे.

बेळगाव : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC Bus) बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना किंवा वारसांना मिळणाऱ्या भरपाई रकमेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ३ लाख रुपये भरपाई रक्कम दिली जात होती. आता सुधारित आदेशात भरपाईची रक्कम १० लाख करण्यात आली आहे. हा सुधारित भरपाईचा आदेश येत्या १ जानेवारीपासून लागू केला जाणार आहे.

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (Karnataka Corporation) २०१७ पासून प्रवासी अपघात मदत निधी रकमेमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यासंदर्भात अनेकदा झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी (Transport Minister Ramalinga Reddy) यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत परत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यात भरपाई रक्कम ३ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भरपाई रकमेतील वाढ पाहता नुकसान भरपाई निधीची किंमत उत्पन्नापेक्षा जास्त असेल. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाकडून भरपाई निधी खर्च रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार ५० ते ९९ रुपयांच्या तिकीट दरावर १ रुपये व १०० हून अधिक प्रवासाच्या तिकीट दरावर २ रुपये शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित शुल्क आकारणी आणि भरपाई रक्कमेतील वाढसंदर्भातील निर्णय येत्या १ जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.

महिला प्रवाशांना वगळले

शक्ती योजनेंतर्गत महिला प्रवाशांच्या तिकीट रकमेवर १ रुपये भरपाई निधी शुल्क घेण्यात येणार नाही. सदर रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. यामुळे महिला प्रवाशांना यातून वगळले आहे.

केएसआरटीसीवर थोडक्यात नजर

  • विभागीय कार्यालये १६

  • उपविभागीय कार्यालये ८३

  • कार्यरत बसस्थानके १७४

  • एकूण बससेवा ७,६४९

  • एकूण बसेस ८,३५५

  • दररोज बसेसचा प्रवास २६.९३ लाख किमी

  • दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३२.४८ लाख

  • शक्ती योजनेंतर्गंत महिला प्रवाशांची संख्या १८.४१ लाख

  • शक्ती योजनेतील महिला प्रवाशांचे तिकीट रक्कम ५.४९ कोटी

  • एकूण कर्मचारी ३३,९३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT