kumbh mela 2021 
देश

कुंभमेळा : गंगेत डुबक्या मोजूनच मारायच्या, पोलिस ठेवणार पाळत; वाचा नियम

सकाळ ऑनलाईन टीम

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीदिवशी सुमारे सात लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर पवित्र स्नान केले, अशी माहिती उत्तराखंडच्या माहिती विभागाने दिली आहे.  आरतीवेळी धार्मिक विधीमध्येही 7 लाख 11 हजार भाविकांनी सहभाग घेतला. 

दरम्यान, कुंभमेळ्यात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 974 जणांवर कारवाई केल्याची माहिती राज्य सरकारने दिली. कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड दहशतवादविरोधी पथक, प्रादेशिक सशस्त्र पोलीस व केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, पाच बॉम्ब शोधक पथकेही हरिद्वारमध्ये तैनात केली आहेत. बिनतारी दळणवळण यंत्रणेबरोबरच संपूर्ण कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

12 वर्षांनी होणारा कुंभमेळ्याचे देशभरातील भाविकांना आकर्षण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे साडेतीन महिन्यांऐवजी 48 दिवसच कुंभमेळा होईल. त्यामुळे  27 एप्रिलला कुंभमेळ्याची सांगता होईल.  

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास योजना 

कुंभ मेळ्यामध्ये नदी पात्रात जावून पवित्र गंगा स्नान करणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक भाविकाने केवळ तीन डुबक्या मारुन बाहेर पडावे, अशी योजना आखण्यात आली आहे. यामुळे भाविक अधिक काळ नदीपात्रात थांबणार नाहीत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पोलिस यावर नजर ठेवून राहणार आहेत. गंगा नदी पात्रात स्नान करणाऱ्या भाविकांना तीन डुबक्या मारुन बाहेर पडावे लागेल. या भागात पोलिस कर्मचारी भाविकांना याप्रकारच्या सूचनाही देणार आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात? पंकज विष्णू यांनी सांगितला आकडा

Marathi News Live Updates : कुणबी दाखले पारदर्शकतेने देण्याचे काम सुरु- राधाकृष्ण विखे पाटील

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT