Kunal Kamra tweets about Narendra Modi  
देश

'मोदीजी, तुम्ही मला विमानात भेटलात तर....' : कुणाल कामरा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत विमानात गैरवर्तन केल्याने कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोने सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. इंडिगोसह एअर इंडिया, स्पाईस जेट, गो एअर या विमान कंपन्यांनीही त्याला बॅन केलंय. या बंदीमुळे कुणाल वैतागला असून त्याने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. बघा कुणाल काय म्हणतो मोदींना... 

कुणाल दररोज काही ना काही ट्विट कराताना दिसतो. मोदींना लक्ष्य करून त्याने ट्विट करण्याचा सपाटाच  लावला आहे. ट्विटमध्ये तो म्हणतो की, 'मोदीजी तुम्ही अंबानीच्या विमानातून किंवा आदानींच्या हेलिकॉप्टरमधूनच फिरा... चुकून मला विमानात भेटलात आणि मी पुन्हा भावनिक झालो तर आयुष्यभरासाठी मला आयआरसीटीसीशी झुंजावं लागेल.' असं ट्विट त्यानं मोदींना उद्देशून केलंय.  याचा अर्थ असा की मोदी त्याला विमानात भेटले, तर तो जसा अर्णबला बोलला तसा मोदींनाही बोलू शकतो व त्यामुळे त्याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात येऊ शकते व त्याला रेल्वेने प्रवास करावा लागेल. यासाठी मोदीजी तुम्ही मला विमानात भेटू नका.. असे ट्विट त्यानं केलंय. 

२८ जानेवारीला मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानात कुणालला अर्णब गोस्वामी भेटले. त्यांना तो बरंच आक्षेपार्ह बोलला. अनेक प्रश्नांचा भडीमार केला ज्यावर अर्णब यांनी काहीही उत्तर दिले नाही. कुणालच्या या गैरवर्तनामुळे इंडिगोने त्याच्यावर ६ महिन्यांची बंदी घातली आहे. इंडिगोनंतर एअर इिडिया, स्पाईस जेट, गो एअर या कंपन्यांनीही त्याच्यावर बंदी घातली. 

इंडिगोने कुणालवर बंदी घातल्याने दिग्दर्शक अनुराग कश्यपने इंडिगोवरच बंदी घातलीय. जोपर्यंत कुणालला विमानप्रवास करू देत नाही, तोपर्यंत मीही इंडिगो वापरणार नाही, असे अनुरागने सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT