Kuno National Park 
देश

Kuno National Park : कुनोतील सहावा बिबट्याही जंगलात

भारतीय वन्यजीव संस्थेची माहिती; चित्त्याबरोबरचा संघर्ष टळणार

सकाळ वृत्तसेवा

शेओपूर(मध्य प्रदेश) : कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या मोठ्या आवारात ठेवलेल्या सहा बिबट्यांपैकी पाच बिबट्यांना यापूर्वी जंगलात सोडण्यात आले असून यातील शेवटच्या सहाव्या बिबट्यानेही जंगलात प्रवेश केला, अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेने दिली. नामिबियातून भारतात सप्टेंबरमध्ये आठ चित्ते आणण्यापूर्वीच या बिबट्यांनी आवारात प्रवेश केला होता. यापूर्वी, पाच बिबट्यांना आवारातून बाहेर काढण्यात आले होते. आता आवारातील शेवटचा बिबट्याही बाहेर पडल्याने त्यांचा चित्त्यांशी संघर्ष टळला आहे.

कुनो उद्यानाचे विभागीय वनाधिकारी प्रकाशकुमार वर्मा म्हणाले, की वन्यजीव संस्थेच्या माहितीनुसार मोठ्या आवारातील शेवटचा बिबट्या बाहेर पडल्याचे कॅमेराने टिपले. यापूर्वी, चित्त्यांसाठीच्या आवारातील पाच बिबट्यांना बाहेर काढण्यात आले होते. आवारात फिरणाऱ्या एकमेव बिबट्यानेही आवार सोडले. हा बिबट्या सहा क्रमांकाच्या आवारात फिरत होता, अशी माहितीही त्यांनी दिली.

देशातून नामशेष झालेल्या चित्त्याचे पुनर्वसन करण्यासाठी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेतून सप्टेंबरमध्ये आठ चित्त्यांना नामिबियातून भारतात आणण्यात आले. त्यानंतर, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर सुरुवातीला तीन चित्त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मोठ्या आवारात हलविण्यात आले. उर्वरित पाच चित्त्यांना या महिन्यात मोठ्या आवारात हलविले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT