देश

विहीरीत पडून १३ जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Kushinagar UP : काल रात्री लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. विहीरीवर असलेला स्लॅब कोसळल्यानं ही घटना घडल्याचं समजतंय. कुशीनगरमध्ये काल रात्री ८:३० वाजता लग्नाच्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेत १३ जणांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. घटना घटडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली. स्थानिकांच्या मदतीने रात्री मदतकार्य सुरु होते. (13 Women Died in Kushinagar, Gorakhpur, Uttar Pradesh)

गोरखपूर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया परिसरातील नौरंगिया स्कूल टोला येथील एका घरात लग्न समारंभ होता. यावेळी गावातील महिला व मुली लग्न असलेल्या घराजवळील विहिरीवर उभ्या होत्या. हळदीचा विधी केला सुरु केला जाणार होता. त्याचवेळी महिला आणि मुली उभ्या असल्याने विहिरीवरील लोखंडी जाळी अचानक तुटल्यानं महिला व मुली विहिरीत पडल्या. या घटनेत काही जण जखमी असून, मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांनीही या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT