Ladli Behna Scheme Madhya Pradesh  Esakal
देश

Ladli Behna Scheme: या महिलांना मिळणार नाही 'लाडली बहना'चा लाभ; सरकारचे नवे नियम अनेकांना देणार धक्का

Ladli Behna Scheme Madhya Pradesh: ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते देखील योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

आशुतोष मसगौंडे

मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडली बहना योजना ही देशातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे.

या अंतर्गत दर महिन्याला एका क्लिकवर थेट महिलांच्या बँक खात्यात 1250 रुपये पाठवले जातात. मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळत आहे.

28 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात लाडली बहना योजना सुरू केली होती. यापूर्वी महिलांच्या खात्यात फक्त 1000 रुपये दिले जात होते, मात्र नंतर ही रक्कम वाढवून 1250 रुपये करण्यात आली.

दरम्यान मुख्यमंत्री लाडली बहना योजनेच्या नियमांमध्ये मध्य प्रदेश सरकारने मोठे बद केले आहेत.

या महिलांना मिळणार नाही लाभ

मध्य प्रदेश सरकारच्या नव्या नियमांनुसार ज्या महिलांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.

अविवाहित महिला लाडली बहन योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते देखील योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

ज्या कुटुंबात सध्या किंवा माजी खासदार, आमदार आहेत किंवा कोणतेही सरकारी पद धारण करत आहेत अशा कुटुंबातील महिला देखील लाडली बहन योजनेसाठी पात्र नाहीत.

या महिलांनाच लाभ

अर्जदार महिला मूळची मध्य प्रदेशची असावी.

ज्या महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत.

कोणत्याही प्रवर्गातील महिला लाडली बहन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अर्जदार स्वत: किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा.

ज्यांच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT