Lakhimpur Kheri Case esakal
देश

लखीमपूर प्रकरण: आशिष मिश्राच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो तसेच साक्षीदारांना धोका निर्माण होऊ शकतो असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.(Lakhimpur Kheri Case Updates)

शिवकुमार त्रिपाठी आणि सी. एस. पांडा या वकिलांनी ही याचिका सादर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयाचा निर्णय गृहीतक आणि अनुमानावर आधारित आहे. आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे साक्षीदारांसह शेतकरी आणि हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना धोका उद्भवतो. त्यामुळे हा जामीन रद्द करण्यात यावा.

याच दोन वकिलांनी गेल्या वर्षी याचिका सादर केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विशेष तपास पथक स्थापन करण्याचा आदेश दिला होता. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्राला देण्यात यावा अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

मंत्री मिश्रांच्या चौकशीची मागणी

अॅड. शिवकुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली नाही. त्यामुळेच आशिषला जामीन मिळणे सुकर झाले. एसआयटीने सर्वोच्च न्यायालयात अद्याप अहवालही सादर केलेला नाही. तो त्वरेने सादर करण्याचा आदेश देण्यात यावा. एसआयटीने आशिषचे वडील अजय यांचीही चौकशी करायला हवी. एसायटीने तसे केले असते तर जनतेला चौकशीबाबत विश्वास वाटला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT