Lakhimpur Kheri Case esakal
देश

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर खेरी प्रकरणात शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेशी संबंधित अन्य चार आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केलीय.

नवी दिल्ली : नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणात (lakhimpur kheri case) शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेशी संबंधित अन्य चार आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केलीय. यात भाजप नेते सुमित जयस्वाल (BJP leader sumit Jaiswal) यांचा समावेश आहे. जे घटनेच्या वेळी त्या एसयूव्हीमध्ये (SUV) कथितरित्या स्वार होते. सुमित जयस्वाल हे भाजपचे स्थानिक नेते आहेत. दरम्यान, सुमित जयस्वाल यांनी अज्ञात शेतकर्‍यांविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला असून चालक, मित्र आणि दोन भाजपच्या कार्यकर्त्यांना मारेकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला (Ashish Mishra) आधीच अटक करण्यात आलीय.

लखीमपूर घटनेत 4 शेतकऱ्यांसह एक पत्रकार ठार झालाय. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे घडली. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलीय. सुमित जयस्वाल यांच्या व्यतिरिक्त शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना लखीमपूर खेरी पोलीस (UP Police) आणि गुन्हे शाखेच्या टीमनं ताब्यात घेतलंय.

वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितलं, की सत्य प्रकाश त्रिपाठी यांच्याकडून रिव्हॉल्व्हर आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी यूपी पोलिसांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला आधीच अटक केलीय. शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी एका व्हिडिओत सुमित जयस्वाल हे एसयूव्हीच्या बाहेर पळताना दिसत आहेत. जयस्वालांच्या स्टेटमेंटच्या आधारे ओळख पटलीय. मात्र, सुमित यांनी हा आरोप फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT