lakhimpur kheri 
देश

लखीमपूर खेरी हत्याकांड : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला जामीन

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी एसआयटीने याप्रकरणी न्यायालयात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. यात आशिष मिश्राला मुख्य आरोपी आणि इतर १४ सहआरोपी आहेत

लखनऊ - लखमीपूर खेरी (Lakhimpur Kheri) इथं ३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाला जामीन मिळाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राला (Ashish Mishra) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ (Lucknow) खंडपीठाने जामीन दिला आहे.

काही दिवसांपूर्वी एसआयटीने लखमीपूर खेरी प्रकरणी न्यायालयात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. यात आशिष मिश्राला मुख्य आरोपी आणि इतर १४ सहआरोपी आहेत. आरोपपत्रानुसार शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना हा अपघात नव्हे तर षडयंत्र होतं.

लखीमपूरमध्ये ३ ऑक्टोबरला झालेल्या घटनेत ४ शेतकरी आणि एका स्थानिक पत्रकारासह ८ जणांची हत्या झाली होती. या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रासह त्याच्या सहकाऱ्यांनी गोळीबार करून शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर ३ ऑक्टोबरला आशिष मिश्रासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT