राहुल अन् प्रियंका गांधी लखीमपुरात, पीडित कुटुंबीयांचं सांत्वन sakal
देश

राहुल आणि प्रियांका गांधी लखीमपूरमध्ये, पीडित कुटुंबीयांचं केलं सांत्वन

जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सत्याग्रह चालूच राहील, तुझं बलीदान विसरणार नाही.'' असं राहूल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनौ - काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी बुधवारी रात्री लखीमपूरमध्ये हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा शहीद असा उल्लेख करत राहुल गांधींनी जोवर मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोवर सत्याग्रह सुरू राहणार, असा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान भरधाव जीपने चार शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना रविवारी घडली होती. यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. प्रियांका गांधी या सोमवारी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लखीमपूर खेरी येथे जाणार होत्या.

मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना रोखले होते. यानंतर राहुल गांधी यांनी लखीमपूर खेरी येथे जाणार, असे सांगितले होते. अखेर बुधवारी रात्री राहुल आणि प्रियांका गांधी हे लखीमपूरमध्ये पोहोचले.

राहुल आणि प्रियांका यांनी मृत्यूमुखी पडलेल्या लवप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ''शहीद लवप्रीतच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले. पण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सत्याग्रह चालूच राहील, तुझं बलिदान विसरणार नाही.'' असं राहूल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT