देश

हत्येनं आंदोलकांना गप्प करू शकत नाही - भाजप खासदार वरुण गांधी

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूरमध्ये तीन ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केली आहेत.

लखीमपूरमध्ये तीन ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केली आहेत. यासदंर्भात त्यांनी योगी सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसंच पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणीसुद्धा वरुण गांधी यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारी वरुण गांधी यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

वरुण गांधींनी लखीमपूर घटनेचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, हा व्हिडिओ स्पष्ट आहे. आंदोलकांची हत्या करून त्यांना गप्प बसवलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे जे रक्त वाहिले आहे त्याला जबाबदार कोण? पीडितांना न्याय मिळायला हवा. शेतकऱ्यांमध्ये असा संदेश जायला नको की आपण क्रूर आहे.

याआधी वरून गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणाचंही हृदय हेलावून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओवरून गाडी मालक आणि त्यात बसेलल्या लोकांसह सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT