mohammad faizal 
देश

Supreme Court : खासदारकी रद्द झालेले फैजल सर्वोच्च न्यायालयात; हायकोर्टाने यापूर्वीच...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फैजल यांना खुनाच्या प्रयत्न प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली होती, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. 25 जानेवारी रोजी केरळ उच्च न्यायालयाने १० वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. परंतु लोकसभा सचिवालयाने अपात्रतेचा आदेश मागे घेतलेला नाही.

यापूर्वी 30 जानेवारी 2023 रोजी खासदार मोहम्मद फैजलच्या हत्येच्या प्रयत्नाच्या शिक्षेला केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाची सुनावणी लवकर व्हावी, असं म्हटलं होत.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने सांगितले की हे प्रकरण फार तातडीचे नाही, त्यामुळे पुढील आठवड्यात हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाईल.

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची जागा रिक्त घोषित केली होती. हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना जानेवारीत शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

Latest Marathi News Live Update : ७५ विद्यार्थी परदेशात अडचणीत, फंडस् नॉट रिसिव्हीड अधिकाऱ्यांची लाजिरवाणी कबुली!

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

भुयारी मार्गाने जोडले जाणार ठाणे-बोरीवली! देशातील सर्वात लांब शहरी बोगदा होणार; ११ किलोमीटरचा मार्ग कसा असेल?

SCROLL FOR NEXT