Lakshadweep Tour esakal
देश

Lakshadweep Tour: मोदींचा एक फोटो अन् लक्षद्वीपचे बदलले नशीब, विदेशातील पर्यटकांच्या देखील लागल्या रांगा

Lakshadweep Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपचा दौरा केला होता. त्यानंतर पर्यटकांच्या मनात लक्षद्वीप भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

Sandip Kapde

Lakshadweep Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी लक्षद्वीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी त्यांना ट्रोल देखील करण्यात आले मात्र त्यांच्या फोटोमुळे म नशीब बदलले आहे.

अनेक पर्यटक लक्षद्वीपला भेट देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते की लक्षद्वीपला भेट द्या. याचा मोठा व्यापक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यटन अधिकारी इम्थियास मोहम्मद टीबी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांना पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या परिणामाबद्दल विचारले असता ते म्हणाले, "प्रभाव खूप मोठा आहे. या बेटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे."

लक्षद्वीपला देशातूनच नाही तर विदेशातून देखील पर्यटकांची मागणी वाढली आहे. लक्षद्वीपला आणखी क्रूझ जहाज कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. हवाई कनेक्टिव्हिटी व्यवस्थित झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्वास देखील पर्यटन अधिकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी 4 जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याने द्वीपसमूह आणि त्याच्या प्रचंड पर्यटन क्षमतेकडे जगाचे लक्ष वेधले आहे. लक्षद्वीपला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाच्या अफाट क्षमतेवर लक्ष केंद्रित केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे."

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. नरेंद्र मोदींनी समुद्रकिनाऱ्यावर मोकळ्या आकाशाखाली छायाचित्रे क्लिक केली होती. फोटो शेअर करताना त्यांनी लक्षद्वीपला त्यांच्या गंतव्यस्थानाच्या यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT