Lal Krishna Advani Bharat Ratna esakal
देश

Lal Krishna Advani Bharat Ratna : पदोपदी अपमान अन् आता भारतरत्न, महिन्याभरात कसं बदललं मोदी-अडवाणी यांच्यातील नातं?

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली. शिवाय त्यांनी अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.

संतोष कानडे

नवी दिल्लीः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आणि अडवाणींना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सांगितलं की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. माझं त्यांच्याशी बोलणं झालं असून त्यांचं मी अभिनंदन केलं.

मोदी पुढे लिहितात, लालकृष्ण अडवाणी हे माझ्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. भारताच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. अगदी तळागाळापासून काम करुन ते उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. त्यांची संसदीय कारकीर्द कायमच समृद्ध करणारी ठरली.

मोदी सत्तेत आल्यापासून अवहेलना

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांची पक्षातील पत ढासळत गेली. वेळोवेळी त्यांचा अपमान झाला. विशेष म्हणजे अनेक जाहीर कार्यकक्रमांमधून मोदी अडवाणींना टाळत असल्याचं दिसून आलेले आहे. तरीही अडवाणींना भारतरत्न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतय.

दहा दिवसांत मोदी-अडवाणींच्या नात्यात जिव्हाळा?

जानेवारीतल्या २२ तारखेला अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला अडवाणींना निमंत्रण दिलं नसल्याचं पुढे आलं. नंतर मात्र त्यांना निमंत्रण गेलं. परंतु ऐनवेळी प्रकृतीचं कारण समोर आलं आणि ते अयोध्येत उपस्थित राहिले नाहीत. याचवेळी अडवाणी यांनी मोदींबद्दल जे विधान केलं, त्यामुळे दोघांमधील नात्यामध्ये नव्याने जिव्हाळा निर्माण झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

काय म्हणाले होते अडवाणी?

लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, नियतीने ठरवले आहे की अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल. हा क्षण आणल्याबद्दल आणि रामलल्लाचे भव्य मंदिर उभारून त्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो.

''प्रभू श्रीरामांनीच आपल्या भक्ताची निवड या पवित्र कार्यासाठी केली आहे'' असं म्हणत अडवाणींनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आता त्यानंतर शनिवारी (दि. ३) त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Floods: मराठवाड्यातील पुराने पोटच्या पोरांनाही गिळलं… २ वर्षांची चिमुकली आणि १० वर्षांचा मुलगा वाहून गेला

MPSC Appointment Letter: मेळाव्याची चमकोगिरी करण्यासाठी नियुक्तीपत्रं अडवली, MPSCतून नोकरी मिळूनही बेरोजगार राहण्याची वेळ

माेठी बातमी! 'पुरामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर': १४ ऐवजी २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार परीक्षा

Marathwada Flood: पाऊस थांबला, पूर कायम; अनेक धरणांमधून विसर्ग सुरूच, पिके अद्याप पाण्याखाली

Jayakwadi Dam: अन् पैठणकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास..! ‘जायकवाडी’चा विसर्ग कमी केल्याने दिलासा, व्यवहार पूर्ववत

SCROLL FOR NEXT