Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात मोदी जाणार ब्रिटनच्या कोर्टात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

राहुल गांधींना संसदेतून अपात्र ठरवल्या नंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi : गुरुवारी आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींच्या 'मोदी आडनाव'च्या विधानाबाबत ललित मोदी यांनी यूकेमधील न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ललित मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. वास्तविक, ललित मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांना नुकतेच मोदी अपमान प्रकरणी दोषी ठरवून गुजरातच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या कारवाईपासून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असून अनेक आरोप करत आहे. (Lalit Modi to sue Pappu Rahul Gandhi in UK court for his Modi surname people are thieves remark, read details)

ललित मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहेत. मला कोणत्या आधारावर फरार म्हटले जात आहे, मला कधीच दोषी ठरवण्यात आलेले नाही असा प्रश्न आयपीएलचे संस्थापक मोदी यांनी केला.

ललित मोदी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्ला चढवला आहे. ललित मोदी म्हणाले की, विरोधकांकडे काहीच काम नाही, त्यामुळे एकतर ते चुकीची माहिती ठेवतात किंवा सूडाच्या भावनेने असे करतात.

खरे तर ललित मोदींबाबत देशात अनेकवेळा विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे की, ललित मोदी हे फरार असून त्यांच्या अटकेची मागणी करत आहे. अशा स्थितीत ललित मोदी यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे.

ललित मोदी म्हणाले, "मी राहुल गांधींना ताबडतोब ब्रिटनमधील न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की त्यांना काही ठोस पुरावे समोर आणावे लागतील"

ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देशातील अनेक नेत्यांना टॅग करत गांधी परिवाराची विदेशात किती संपत्ती आहे याचा पुरावा माझ्याकडे असल्याचे म्हटले आहे.

माझ्याकडे सर्व पुरावे आणि पत्ते आहेत. मी पुराव्यासाठी या सर्व मालमत्तांचे फोटो आणि पत्ते पाठवू शकतो. देशातील जनतेला मूर्ख बनवू नका, देशावर राज्य करण्याचा आपला हक्क आहे, असे गांधी परिवाराला वाटते.

2019 च्या निवडणुकीच्या रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या विधानाचा संदर्भ देत ललित मोदी म्हणाले की, मी या प्रकरणाबाबत ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करणार आहे, परंतु सत्य हे आहे की जगाला माहीत आहे की भारताची पाच दशके दिवसाढवळ्या गांधी घराण्याने लूट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT