Rohini Acharya announcing her decision to leave both her party and family after Lalu Prasad Yadav’s major election setback.
esakal
Lalu Prasad Yadav Shock as Rohini Acharya quits party and family : बिहार विधानसभा निवडणुकीत जबरदस्त दणका बसल्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षासह त्यांच्या कुटुंबातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आधीच मोठ्या मुलाला कुटुंबातून आणि पक्षातून बाहेर केलेले असताना, आता लालू प्रसाद यादव यांच्या आणखी एका अपत्याने त्यांच्या पक्षातून आणि कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून लालू प्रसाद यादव अद्याप सावरलेलेही नव्हते, तोच त्यांना आणखी एक जबरदस्त झटका बसला आहे.
कारण, लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी राजकारण आणि लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब या दोन्हींपासून दूर राहण्याची घोषणाही केली आहे.
ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये, रोहिणी यांनी राजकारण सोडण्याचा त्यांचा हेतूच जाहीर केलाच नाही तर कुटुंबापासून दूर राहून शांत जीवन जगण्याची त्यांची इच्छाही व्यक्त केली आहे. त्यांच्या भावनिक पोस्टमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, कारण हा निर्णय निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर आला आहे, जेव्हा राजद निराशाजनक कामगिरीचा अनुभव घेत आहे.
रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, संजय यादव आणि रमीज यांच्या दबावाखाली त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यांनी लिहिले की त्या दोष स्वत: घेत आहेत, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. या आरोपाने पहिल्यांदाच आरजेडीमधील चालू तणाव उघडकीस आणला. कुटुंबातील तणाव केवळ वैयक्तिक बाबींवरच नव्हे तर राजकीय संतुलनावरही परिणाम करत आहे हे देखील यातून स्पष्ट झाले.
रोहिणी यांच्या विधानावर आरजेडीने पण महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. पक्षाने म्हटले आहे की, ही वैयक्तिक कौटुंबीक बाब आहे आणि त्याचे जास्त राजकारण करण्याची गरज नाही. तथापि, या भूमिकेवरून असेही दिसून येते की पक्ष सध्या जनतेसमोर हा वाद वाढवू इच्छित नाही. तथापि, हा मुद्दा दाबण्याचे जितके प्रयत्न होत आहेत, तितकेच तो राजकीयदृष्ट्या अधिक गंभीर होत चाललाय.
निवडणुकीत आरजेडीचे फक्त २५ जागांवर घसरणे हे त्यांच्या संघटनात्मक कमकुवतपणा आणि नेतृत्व संकटाचे संकेत देते. तेजस्वी यादव यांचे आकर्षण कमी होत चालले आहे, तर लालू कुटुंबातील तिकीट वाटप आणि रणनीतीवरून अंतर्गत संघर्ष बराच काळ चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.