

esakal
Tej Pratap Political Reaction on Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने प्रचंड बहुमत मिळवल्याचं आज निकालावरून स्पषट झालंय. तर विरोधी महाआघाडीचं पुरतं पानीपत झालं आहे, त्यांना अवघ्या ४० जागांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. महाआघाडीचे उमेदवार असणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला केवळ २६ जागा मिळताना दिसत आहे. यावरून आता त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी जोरदार टीका केली आहे.
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष असणाऱ्या तेजप्रताप यादव यांनी म्हटले की, आमच्या पराभवातही जनतेचा विजय दडलेला आहे. कारण, बिहाराने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, आता राजकारण घराणेशाहीवर नाही तर सुशासन आणि शिक्षणावर होईल. जयचंदांसाठी हा एक मोठा पराभव आहे. आम्ही आधीच सांगितले होते की या निवडणुकीनंतर बिहारमधून काँग्रेसचा नाश होईल आणि आज ते स्पष्ट झाले आहे."
तेजप्रताप यादव पुढे म्हणाले, "मी तर हरल्यानंतरही जिंकलो आहे, कारण माझ्यासोबत लोकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद आहेत. पण सत्य कटू आहे. या जयचंदांनी आरजेडीला आतून पोकळ केले आहे, उद्ध्वस्त केले आहे. म्हणूनच तेजस्वी आज फेलस्वी झाला. ज्यांनी आपली खुर्ची आणि राजकारण वाचवण्यासाठी स्वतःचे घर आगीत टाकले त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. मी वारंवार म्हणतो की जनता ही आपली पालक आहे. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे आणि त्याच भावनेने मी तुमचा निर्णय स्वीकारतोय."
एवढंच नाहीतर पुढे तेजप्रताप यादव यांनी असंही म्हटलं की, बिहारने सुशासनाचे सरकार निवडले आहे. आम्ही त्याचा आदर करतो आणि जनतेच्या हितासाठी प्रत्येक पावलावर रचनात्मक भूमिका बजावू. हा विजय आमचे यशस्वी, कर्मठ पंतप्रधान आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जादुई नेतृत्वाचा पुरावा आहे.
माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुशासनाला जनतेने मनापासून स्वीकारले आहे. बिहारमधील हा ऐतिहासिक विजय भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य माननीय अमित शहा आणि भारत सरकारमधील मंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्या कूटनीति, दूरदृष्टी आणि दैनंदिन परिश्रमाचे परिणाम आहे. या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे एनडीएची अढळ एकता, असल्याही तेजप्रताप यादव यांनी बोलून दाखवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.