tejashwi yadav tejashwi yadav
देश

तेजस्वींचा प्रश्न; देशात एकच घोटाळा झाला आहे का? एकच नेता आहे का?

सकाळ डिजिटल टीम

चारा घोटाळ्याशिवाय देशात दुसरा कोणताही घोटाळा झाला नाही का? एकट्या बिहारमध्ये ८० घोटाळे झाले. सीबीआय, ईडी आणि एनआयए कुठे आहेत? देशात एकच घोटाळा झाला आहे का? आणि एकच नेता आहे का? विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना सीबीआय विसरली आहे, असे प्रश्न लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (tejashwi yadav) यांनी एजन्सींवर उपस्थित केले.

लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांना चारा घोटाळ्याप्रकरणी (Fodder scam) पाच वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. हा अंतिम निर्णय नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयही देशात आहेत. या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयात फिरवला जाईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही तेजस्वी यादव (tejashwi yadav) म्हणाले.

लालूजींनी भाजपशी हातमिळवणी केली असती तर त्यांना राजा हरिश्चंद्र म्हटले गेले असते. परंतु, ते आरएसएस आणि भाजपविरोधात लढले. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. याला आम्ही घाबरणार नाही, असेही तेजस्वी यादव (tejashwi yadav) म्हणाले.

‘मी अन्याय, असमानता, हुकूमशाही, जुलमी सत्तेविरुद्ध लढेन’, असे ट्विट लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांनी केले. लालू प्रसाद यादव यांची पाच वर्षांची शिक्षा कायम राहिल्यास तुरुंगात जावे लागेल आणि ते निवडणुकीच्या हंगामात उतरू शकणार नाहीत. असे झाले तर बिहारच्या राजकारणातील मोठा पक्ष असलेल्या आरजेडीसाठी हा मोठा धक्का असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT