lalu prasad yadav Esakal
देश

Lalu Prasad Yadav on PM : बिना बायकोचे पंतप्रधान आवासात राहणे चुकीचे, लालू यादवांचे संदर्भासहित स्पष्टीकरण

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा एक मजेशीर वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विधान केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lalu Prasad Yadav funny statement:आपल्या विनोदी विधानांमुळे लालु प्रसाद यादव नेहमी चर्चेत असतात. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांसारख्या मोठ्या नेत्यांवरही ते विनोद करतात. लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा एक मजेशीर वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विधान केले आहे.

लालू प्रसाद यादव लग्नाविषयी बोलताना म्हणाले की, "लग्न ही वेगळी गोष्ट आहे आणि देशाचा पंतप्रधान होणे ही वेगळी गोष्ट आहे. मी राहुल गांधी यांना लग्न करायला सांगितले होते, जी एकदम वेगळी गोष्ट आहे. जो व्यक्ती पंतप्रधान बनेल, तो बिनालग्नाचा नाही राहीला पाहिजे. कोणताही पंतप्रधान बिना लग्नाचा नाही राहीला पाहिजे. जे लोक बिना बायकोचे पंतप्रधान आवासामध्ये राहतात, ते चुकीचे आहे."

यादरम्यान लालू प्रसाद यादव यांनी विरोधीपक्ष महायुती लोकसभा निवडणुकीत ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्याबद्दल वक्तव्य केले. (Latest Marathi News)

त्यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाऱ्यांचे व्यवस्थापक आहेत. ते ज्या नेत्याला भ्रष्ट म्हणत होते, त्याला महाराष्ट्रात मंत्री बनवण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे लोक दुतोंडी आहेत. ते सांगतात एक आणि करतात एक.

यापुढे लालू प्रसाद यादव यांनी शरद पवार यांनी समर्थन दर्शवले. त्यांनी अजित पवारांकडून निवृत्त होण्याच्या विधानाला चुकीचे ठरवले. ते म्हणाले की, राजकारणात कोणताही व्यक्ती म्हातारा होतं नाही. याच कोणतही वय नसतं.(Latest Marathi News)

याआधी बुधवारी (दि.५जुलै) ते म्हणाले होते की, "शरद पवारांचा महाराष्ट्रात दरारा आहे. अजित पवार यांचा कोणताही प्रभाव नाही. ते वेगळं झाल्याने काहीही होणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT