Lalu Prasad Yadav with Rohini Acharya 
देश

Lalu Yadav : त्यांना मी तुम्हा सर्वांमध्ये पाठवतेय, आता...; किडनी देणाऱ्या लेकीची भावनिक पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू यादव आज सिंगापूरहून भारतात परतत आहेत. खुद्द लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. (lalu Prasad yadav news in Marathi)

रोहिणी यांनी ट्विट करून म्हटलं की, "मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे नेते आदरणीय लालूजींच्या तब्येतीची. 11 फेब्रुवारीला वडील सिंगापूरहून भारतात जाणार आहेत. मी, एक मुलगी म्हणून माझे कर्तव्य बजावले आहे. माझ्या वडिलांना निरोगी करून मी त्यांना तुम्हा सर्वांमध्ये पाठवत आहे. आता तुम्हीच लोक माझ्या वडिलांची काळजी घ्या, अस आवाहनही रोहिणी यांनी केलं.

5 डिसेंबर 2022 रोजी सिंगापूरमध्ये लालू यादव यांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दान केली आहे. लालूंच्या सात मुली आणि दोन मुलांपैकी रोहिणी दुसऱ्या क्रमांकांच्या मुलगी आहे.

लालू यादव यांना किडनी दिल्यानंतर रोहिणी म्हणाल्या होत्या की, माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव दान करायचे मी ठरवले होतेच. दान ही वाईट गोष्ट नाही. मरणानंतरही तुम्ही लोकांना जीवदान देऊन जावू शकता. मी आता दान केलं आहे. शिवाय मानवी तस्करी होते, निष्पाप मुले-मुली मारल्या जातात, अवयव काढून विकले जातात. हे सर्व थांबले पाहिजे. दानापेक्षा मोठे पुण्य नाही. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी आई-वडिलांची सेवा केली नाही तर तुम्ही चांगले नागरिक कसे बनणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT