Lalu Yadav, Nitish Kumar And Prashant kishor Esakal
देश

Prashant Kishor: लालू-नितीश कुमारांच्या बिहारमध्ये आणखी एक वाटेकरी; प्रशांत किशोर यांनी केली पक्ष स्थापनेची घोषणा

Bihar Assembly Election: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमधील जन सुराज्य संघटनेचे 2 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षात रुपांतर होणार आहे.

आशुतोष मसगौंडे

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीताल आणखी एक वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. असे असले तरी निवडणुकांची तयारी आतापासून सुरू झाली आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमधील जन सुराज्य संघटनेचे 2 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षात रुपांतर होणार आहे. यासाठी प्रशांत किशोर यांनी आठ राज्यस्तरीय बैठकांची तयारी केली आहे. मालिका आखली आहे. पुढील काही आठवड्यांत बोलावल्या जाणाऱ्या या बैठकांमध्ये संपूर्ण बिहारमधून दीड लाखाहून अधिक कार्यकर्ते एकत्र येतील.

या बैठकांचा प्राथमिक अजेंडा नवीन पक्षाच्या स्थापनेच्या प्रक्रियेला अंतिम रूप देणे, ज्यामध्ये त्याची नेतृत्व रचना स्थापन करणे, त्याच्या घटनेचा मसुदा तयार करणे आणि पक्षाच्या प्राधान्यक्रमांची मांडणी करणे हा असेल.

यासाठी आज पाटणा येथे जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत जन सुरज्यमध्ये आणखी तीन मोठ नावे सहभागी झाली आहेत, ज्यात कर्पूरी ठाकूर यांची नात डॉ. जागृती, बक्सरचे माजी लोकसभा उमेदवार आनंद मिश्रा आणि राजदचे माजी विधानपरिषद सदस्य रामबली सिंह चंद्रवंशी यांचा समावेश आहे.

बिहारमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या जन सुराज्य अभियानात शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर तळागाळातील जनतेशी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित केले होते. महात्मा गांधींची जयंती असल्यामुळे पक्षाची स्थापना 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पक्षाच्या स्थापनेसह, प्रशांत किशोर यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुका लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार मोठ्या प्रमाणात सत्ताविरोधी लाटेचा सामना करत आहेत आणि RJD नेते तेजस्वी यादव त्यांच्या पारंपारिक मुस्लिम-यादव व्होट बँकेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ने एक परिपत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना जन सुराज्यच्या मोहिमेशी संबंध न ठेवण्याचा इशारा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT