देश

'आम्ही माफीवीरांचे वंशज नाही'; लालूंच्या भडकलेल्या मुलीने केला सावरकरांचा उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

पाटना: लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. त्यांना सुनावण्यात आलेल्या या शिक्षेनंतर आता त्यांची मुलगी रोहिणी आचार्य या अधिकच भडकलेल्या दिसून आल्या. या शिक्षेच्या सुनावणीनंतर त्यांनी एकामागे एक ट्विट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. (Rohini Acharya)

लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी सिंगापूरमध्ये राहते. ती त्या ठिकाणावरुन ट्विट करत आहे. या ट्विटमध्ये तिने सावरकरांचंही नाव घेतलं असून स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईचा देखील उल्लेख केला आहे. चारा घोटाळ्यामध्ये CBI च्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 60 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या वकिलाने म्हटलंय की, ते या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका करणार आहेत.

या सगळ्या घडामोडींनंतर आता त्यांची मुलगी रोहिणी आचार्यने सावरकरांचा उल्लेख करत एक ट्विट केलंय. तिने म्हटलंय की, तो तुरुंगातून आम्हाला काय घाबरवणार आहे? माफिवीर सावरकरांचे आम्ही वंशज नाही जे इंग्रजांचे तळवे चाटू...

पुढे त्यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलंय की, स्वत:पासूनच नजरा चोरण्याचे प्रयत्न करत आहेत. सृजन घोटाळ्यांसारखे डझनभर घोटाळे करुन नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. पुढे रोहिणी यांनी आपला राग व्यक्त करत म्हटलंय की, लालू यादव यांचं नाव इतिहासाच्या पानावरुन मिटवणं शक्य नाहीये. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून अनेक नेत्यांवर उपरोधिकपणे भाष्य केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT