देश

दिलासादायक! गेल्या 7 दिवसांत 180 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सगळीकडेच कोरोनाचा कहर माजला आहे. या घातक विषाणूमुळे देशातील अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रत्येक दिवशी कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या दरम्यानच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. आज शनिवारी आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं की, गेल्या सात दिवसांपासून देशातील 180 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाहीये.

डॉ. हर्षवर्धन यांनी पुढे म्हटलं की, गेल्या 14 दिवसांमध्ये 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाहीये. याशिवाय गेल्या 21 दिवसांमध्ये 54 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीये.

राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना आवश्यक ती आरोग्यविषयक मदत दिली जात आहे. भारत सरकारच्या वतीने म्हटलं गेलंय की, परदेशातून आलेली मदत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशापर्यंत पोहोचवली जात आहे. यामध्ये आता 2933 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 2429 ऑक्सिजन सिलिंडर, 13 ऑक्सिजन उत्पादन संयंत्र, 2951 व्हेंटिलेटर/ बीआय पीएपी/ सी पीएपी आणि तीन लाखाहून अधिक रेमडेसिव्हीर इंजेक्शन वितरित केलं गेलं आहे.

शनिवारी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत चार लाख 1 हजार 78 नवीन रुग्ण आढळले आहेत. लागोपाठ तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी 18 लाख 92 हजार 676 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी 79 लाख 30 हजार 960 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मृताच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशात दोन लाख 38 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 37,23,446 रुग्ण उपचाराधीन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT