देश

भाजप राज्यातील भयावह स्थिती; दिवसभरात 112 मृत्यू पण सरकारी आकडा फक्त 4

मागील पाच दिवसांत 356 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सरकारी आकेवारीनुसार ही संख्या फक्त 21 आहे.

ई सकाळ टीम

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच भयावह होत चालला आहे. दररोजच्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. 15 दिवसांत रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण तीनपट झालं. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्याचं मत केद्रानं व्यक्त केलं. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचं आकडेवारीवरुन दिसतेय. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये यावरुन झुंपलीही. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुले केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वारंवार चिंता व्यक्त केली. कित्येकवेळा महाराष्ट्र आणि पंजाब येथील कोरोना प्रादुर्भावामुळे चिंतेत असल्याचेही राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. मात्र, आता भाजप प्रशासित राज्यातून भयावह सत्य समोर आलं आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 112 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आला. पण सरकारी आकडेवारीनुसार फक्त 4 जणांची नोंद आहे. दैनिक भास्करनं याबाबतच वृत्त दिलं आहे.

भोपाळमधील भदभदा विश्राम घाट येथील फोटो सरकारचा खोटेपणा अन् कोरोनाची भयावह परिस्थिती दाखवतोय. गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घेतलेला हा फोटो अंगावर शहारे आणणारा आहे. यामध्ये एकाचवेळी 40 पेक्षा जास्त कोरोनानं मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भोपाळमधील या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उरली नव्हती, सरणांसाठी लाकडेही नव्हती. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना तासन् तास वाट पाहावी लागतेय. ही भयावह परिस्थिती आहे, भाजपची सत्ता असलेल्या राज्यात. पण देशासमोर खोटे आकडेवारी देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. सरकारनं लपवलेल्या आकडेवारीमुळे लोंकामध्ये परिस्थितीचं गांभिर्य राहिलं नाही. अन्यथा एकाच दिवशी इतक्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला नसता.

पाच दिवसांत 356 जणांवर अंत्यसंस्कार -

गुरुवारी भोपाळमध्ये एकाच दिवशी 112 कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदामध्ये 72, सुभाष नगरमध्ये 30 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर झदा कब्रिस्तानमध्ये 10 जणांचं दफन करण्यात आलं. पण भोपाळमध्ये मृत्यूचा सरासरी आकडा चार होता. मागील पाच दिवसांत भोपाळमध्ये 356 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सरकारी आकेवारीनुसार ही संख्या फक्त 21 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! टीएमटी बस भाडे वाढणार; मोठ्या आर्थिक संकटामुळे प्रशासनाचा निर्णय

Pune: पुण्यात व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस अनिवार्य; प्रक्रिया मात्र ठप्प, १ फेब्रुवारीपासून आगाऊ बुकिंग बंद

Dhule News : ज्येष्ठांनो काळजी सोडा! १,३५६ आजारांवर मिळणार मोफत उपचार; धुळ्यात 'वय वंदना' मोहीम सुरू

Education News : झूम मीटिंगद्वारे वर्गावर्गांवर नजर! जळगावात कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Latest Marathi News Live Update : 'विद्यमान सरपंच'च ग्रामपंचायतीचा प्रशासक, शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT