Lata Mangeshkar Sakal
देश

पंधरा दिवस 'या' राज्यात सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादीदींंची गाणी

आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

दत्ता लवांडे

कोलकत्ता : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. या घटनेने असंख्य भारतीयांना दु:ख झाले असून महाराष्ट्र सरकारने देखील उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल सरकारने उद्याचा 'हाफ डे' जाहीर केला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सगळ्या सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात आणि वाहतूक सिग्नलवर पुढच्या पंधरा दिवस लता मंगेशकर यांची गाणी वाजवली जातील असा आदेश दिला आहे.

भारताला मिळालेली गायन क्षेत्रातील दैवी देणगी म्हणजे लतादिदी. भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना गौरवले होते. त्याचबरोबर गायन क्षेत्रातील स्वर कोकिळा म्हणून देखील त्यांने ओळखले जाते. त्यांच्या निधनाने भारतभर शोककळा पसरली आहे. मोदींसहीत भारतातील आणि भारताबाहेरील दिग्गजांनी त्यांने श्रद्धांजली वाहीली आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी लतादिदींना श्रद्धांजली वाहीली आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा दुखवटा पाळत उद्या पश्चिम बंगालमध्ये हाफ डे जाहीर केला आहे. त्यांचबरोबर राज्यातील प्रत्येक सार्वजनीक ठिकाणी. वाहतूक सिग्नल, तसेच सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी लता मंगेशकर यांचे गाणे वाजवण्यात येणार आहेत असं जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT