Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता आज (ता. ५) सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

वडगाव बुद्रुक येथे समीर कोळेकरवर कोयत्याने हल्ला

वडगाव बुद्रुक येथे समीर कोळेकरवर सातते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत- फडणवीस

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. पाकिस्तान म्हणत होता कसाबने गोळी चालवली नाही, अपराध केला नाही, स्फोट केला नाही.. नंतर आंतरराष्ट्रीय प्रेशर आलं आणि पाकिस्तानने कसाबचे गुन्हे कबुल केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहिद करकरेंबद्दल विजय वडेट्टीवारांचे धक्कादायक विधान

शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान केले असून त्यांच्यावक्तव्यचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध केला जात असून त्यांच्या नागपूरातील घराबाहेर भाजपकडून आंदोलन केले जात आहे.

रोहित पवारांना हडपसरची उमेदवारी पाहिजे होती- अजित पवार

रोहित पवार यांना मी जिल्हा परिषदेची तिकीटं दिली. साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको. मी त्यांचं ऐकलं नाही आणि तिकीट दिलं. नंतर म्हणाले, मला हडपसरची उमेदवारी द्या. परंतु मी त्यांना कर्जत-जामखेडची उमेदवारी दिली, असं अजित पवार म्हणाले.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, आता मतदानाकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला आहे. या टप्प्यात येत्या सात तारखेला मतदान होणार असून राज्यातील ११ मतदारसंघातील मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट देण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

अमेठीतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत भाजप नेते गौरव वल्लभ म्हणाले, " राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी फसवणूक केली... काँग्रेस स्वार्थासाठी आहे... ही वायनाड आणि रायबरेलीच्या मतदारांची फसवणूक आहे.

India Elections : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 23 देशांमधील 75 हून अधिक पाहुणे देशात आले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. ही देशासाठी एक अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

Baramati : बारामतीत शरद पवार-अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सध्या परिस्थिती नियंत्रणात

बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आज बाईक रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, भिगवन चौकात जेव्हा कार्यकर्ते एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. काही मिनिटांमध्येच या वादाचं रुपांतर मारामारीत झालं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा

बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी सभा होणार आहे. बीडच्या अंबाजोगाई येथे ही सभा होणार आहे.

अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग

मायदेशात होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अमेरिकेने आपला संघ जाहीर केला असून त्यात सौरव नेत्रावलकर आणि हरमीत सिंग हे दोन मुंबईकर खेळाडू आहेत

उत्तर मुंबईत पियुष गोयलांची भव्य रॅली; हजारो कार्यकर्ते सहभागी

उत्तर मुंबईतून शिवसेना भाजपा महायुतीकडून उमेदवारी मिळवलेल्या पियुष गोयल यांनी आज रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत उत्तर मुंबई मतदार संघातील मागाठाने मतदार संघात भव्य रॅली काढली.

नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांच्या खांद्यावर पुन्हा काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवली आहे. नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र स्टार प्रचारकची देण्यात आली आहे.

PM Modi: इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

अनेक भाजप समर्थकांनी इस्रायलमधील तेल अवीव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून येण्याच्या समर्थनार्थ बैठक घेतली.

Indian Army: "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत,"

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमीक जामी यांनी पुंछ, जम्मू आणि काश्मीरमध्ये आयएएफच्या ताफ्यावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत. हे सरकार अपयशी ठरले आहे आणि त्यामुळे नवीन सरकार निवडण्यासाठी पुढे जाण्याची गरज आहे.

Karnataka Government: भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात काँग्रेसने दाखल केले गुन्हे

काँग्रेसने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय, भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात कर्नाटक भाजपने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सदस्यांना मतदान न करण्यासाठी धमकावल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ एप्रिलला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रायगडमधील अलिबागमध्ये सभा घेणार आहेत. अनंत गिते यांच्यासाठी ते सभा घेतील.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात बाईक रॅली घेणार आहेत. महायुतीचे उमदेवार संजयकाका पाटील यांचा ते प्रचार करणार आहेत.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

पंतप्रधान मोदी यांचा आज अयोध्येमध्ये रोडशो आहे. यावेळी ते राम जन्मभूमी मंदिराला भेट देतील आणि राम लल्लांचे दर्शन घेतील.

Ajit Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

आज सुपरसंडे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगता सभा घेणार आहेत. बारामतीमध्ये ही सभा होईल.

Odisha Lok Sabha : जय नारायण पटनायकांना पुरी, ओडिशातून उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जय नारायण पटनायक यांना पुरी, ओडिशातून तिकीट दिले आहे. यापूर्वी सुचित्रा मोहंती यांना येथून तिकीट मिळाले होते, त्यांनी पक्षाकडून निधी दिला जात नसल्याचे सांगत तिकीट परत केले होते. जय नारायण पटनायक यांच्या तिकिटाला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली असल्याचे काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Sangli Crime : दुचाकी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्यांची करारपत्र करून विक्री करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. तिघा चोरट्यांकडून १९ दुचाकींसह ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजय पुंडलिक माने (वय ४०, दानोळी, जि. कोल्हापूर), मुऱ्याप्पा नरसिंग हाबगोंड (३७, जिरग्याळ, ता. जत) आणि अन्सार अक्रम बुऱ्हाण (२१, कागवाड जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

Indian Army : जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जवान जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी आज भारतीय हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये पाच जवान हे जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही लष्करी वाहने सुरानकोट जिल्ह्यातील सनाई टॉपच्या दिशेने जात असताना त्यावर शशीधरनजीक हा हल्ला झाला. या हल्ल्यातील जखमी जवानांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

JDS leader HD Revanna : धजद नेते रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात

बंगळूर : लैंगिक छळ आणि अपहरण प्रकरणात आरोपी असलेले माजी मंत्री आणि होळेनरसिंपूरचे धजद आमदार एच. डी. रेवण्णा (H. D. Revanna) यांना विशेष तपास पथकाने (SIT) शनिवारी ताब्यात घेतले. रेवण्णा यांना अपहरणप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Brazil Rain : मुसळधार पावसामुळे ब्राझीलमध्ये 56 लोकांना गमवावा लागला जीव

ब्राझील : मुसळधार पावसामुळे ब्राझीलमध्ये तब्बल 56 लोक ठार झाले आहेत. इथं सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. घराघरांत पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर काढण्यात येत आहे. कोसळलेली घरे, पूल आणि रस्त्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

Hatkanangale Lok Sabha : इचलकरंजीत आज उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांच्या प्रचाराची सांगता जोरदार शक्तिप्रदर्शनाने आज (रविवार) येथे होत आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघेल. यामध्ये १० हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील - सरुडकर यांच्या प्रचारार्थ शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येईल. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या पदयात्रा कबनूर चौकातून निघेल.

Mangalore Airport : मंगळूर विमानतळाला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल

बंगळूर : मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एमआयए) अधिकाऱ्यांना बॉम्बची धमकी देणारा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. २९ एप्रिलला धमकी आली होती. पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी सांगितले की, अनोळखी व्यक्तीने मंगळूर विमानतळावर ई-मेल पाठवला होता. ज्याने विमानतळ आणि विमानात स्फोटके ठेवल्याची धमकी दिली होती. एमआयएचे मुख्य सुरक्षा अधिकारी मोनिष के. जी. यांनी बाजपे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ED Raid : व्हीआयपीएसच्या कोल्हापुरातील एजंटांवर ईडीचे छापे

कोल्हापूर : व्हीआयपीएस ग्रुप ग्लोबल एफिलिएट बिझनेस कंपनीने गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कोल्हापूर, नाशिक, पुणे येथे छापे टाकले. कंपनीचा मालक विनोद खुटे याच्यासह साथीदारांवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापुरातील कंपनीचे एजंट तोरस्कर बंधू यांच्या उद्यमनगरातील कार्यालय व उचगाव घरावर छापेमारी करण्यात आली. यात पथकाने तोरस्कर बंधूंची सुमारे ५ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Lok Sabha Elections : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता आज (ता. ५) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. नीटची आज परीक्षा होत असून देशातील २४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंत्री नितीन गडकरी यांची अक्कलकोटमध्ये जाहीर सभा होणार आहे. एका महिलेच्या अपहरण प्रकरणामध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते (जेडीएस) आणि आमदार एच. डी. रेवण्णा यांना विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एमआयए) अधिकाऱ्यांना बॉम्बची धमकी देणारा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT