Delhi Metro line jam
Delhi Metro line jam sakal
देश

मेट्रोने लाखो दिल्लीकरांना पुन्हा रडविले!

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीच्या ब्ल्यू लाईन मेट्रोसेवेत आज पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या कार्यालयीन वेळेत लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. काय बिघाड झाला याबाबत मेट्रोने पुन्हा लपवाछपवी केल्याने प्रवाशांचा संताप वाढला. मागच्या एका आठवड्यात ब्ल्यू लाईन मेट्रो सेवेचे व्यवस्थापन तिसऱ्यांदा रुळावरून घसरले आहे.

दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रो सेवेतील बिघाडांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषतः नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी/वैशाली या मार्गावरील ब्ल्यू लाईन सेवा ही सर्वाधिक प्रवासी असणारी सेवा मानली जाते. त्यापाठोपाठ जहांगीरपुरी (यलो लाईन) व काश्मिरी गेट-राजा नाहरसिंह (व्हायोलेट लाईन) या मार्गिकांवर लाखो प्रवासी अवलंबून असतात. कोरोना काळात बंद असलेली मेट्रोसेवा या वर्षी सुरवातीपासून १०० टक्के क्षमतेने चालविण्याचा निर्णय या व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र ब्ल्यू लाईन सेवेतील तांत्रिक बिघाडांचे प्रमाण प्रचंड आहे. जेव्हा लाखो प्रवासी जिवाच्या आकांताने कार्यालय किंवा घरी जाण्याची धडपडड करत असतात त्या सकाळ व सायंकाळच्या वेळेत याच मार्गिकेवर हे बिघाड होतात व लाखो प्रवाशांचे, या काळात महिला प्रवाशांचे व बालकांचे फार हाल होतात.

मुख्यतः ओएचई मध्ये (ओव्हरहेड उपकरण) तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण याच ब्ल्यू लाईन मार्गिकेवर सर्वाधिक आहे. मागील वर्, एका तारेवर पक्षी आदळला तरी ही सेवा ठप्प पडली होती. आज सकाळी ९ च्या आसपास या मार्गावर तांत्रिक बिघाड झाला तेव्हा ९.३० ची कार्यालयीन वेळ गाठण्यसाठी जाणारे लाखो प्रवासी यमुना बॅंक स्थानकावरच अडकले. मेट्रोने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. १० च्या आसपास मेट्रोने ट्विट करून, द्वारका सेक्टर-२१ व नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी/वैशाली या मार्गावर तांत्रिक खराबीमुळे सेवा बाधित एवढेच सांगितले. मात्र सेवा पूर्ववत कधी होणार याची माहिती दिली नाही. काही तासांनंतर सेवा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दुपारी १२ पर्यंत यमुना बॅंक स्थानकातील अफरातफरीचे चित्र कायम होते. याचस्थानकात नोएडा व वैशाली या मार्गिका वेगळ्या होतात व लाखो प्रवासी मेट्रो बदलतात.

या आठवड्यात ब्ल्यू लाईन सेवा ठप्प पडण्याची ही तिसरी वेळ होती. सोमवारी (ता.६) सायंकाळी साडसहाच्या सुमारास यमुना बॅंक व इंद्रप्रस्थ स्थानकांदरम्यान एक पक्षी ओएचई-पेन्टोग्राफला दडकल्याने या पूर्ण मार्गावरील सेवा जी ठप्प पडली ती रात्री ११ पर्यंत सुरू झाली नव्हती. मेट्रोने या काळात शटल बससेवा उपलब्ध कल्याचा दावा केला तरी सोमवारी तो खोटा ठरल्याचा अनुभव लाखो प्रवाशांनी घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT