Kapil And Dheeraj Wadhwan Esakal
देश

रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये मिटिंग, लॅपटॉप-मोबाईलचीही सुविधा... DHFLच्या वाधवान बंधूंवर तुरुंग प्रशासन मेहरबान

DHFLचे मालक वाधवान बंधूंवर तुरुंग प्रशासन मेहरबान

अंकिता खाणे (Ankita Khane)

34,614 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मुंबईतील तुरुंगात बंद असलेले डीएचएफएलचे माजी प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान यांच्या प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. 'आज तक'च्या स्पेशल ऑपरेशनमध्ये कारागृह प्रशासनाच्या कृपेने कारागृहात ऐशोआरामात जीवन जगत असल्याचे समोर आले आहे.(Latest Marathi News)

वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात, तिथे पार्किंगमध्ये त्यांची बैठक आयोजित केली जाते. एवढेच नाही तर यादरम्यान दोघेही मोबाईल-लॅपटॉप वापरताना दिसत आहेत. यादरम्यान कपिल आणि धीरज वाधवान यांच्या घरातील लोक आणि इतर सहकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते.(Latest Marathi News)

कपिल आणि धीरज वाधवान या दोन्ही भावांना या वर्षी 14 मे रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. 7 मार्च रोजी सीबीआयने वाधवान बंधूंविरोधात एफआयआर नोंदवला होता. यामध्ये येस बँकेचे प्रवर्तक, राणा कपूर आणि वाधवान बंधूंनी एकमेकांना फायदा करून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. येस बँकेने वाधवान बंधूंना 'अनियमित पद्धतीने' कर्ज दिले होते.(Latest Marathi News)

यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) 15 जुलै रोजी वाधवान बंधू, राणा कपूर, कपूर यांची पत्नी बिंदू कपूर, त्यांच्या मुली रोशनी आणि रेखा आणि त्यांची चार्टर्ड अकाउंटंट फर्म डीके जैन अँड असोसिएट्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT