One nation One election 
देश

One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक'साठी विधी आयोगाचा अहवाल तयार; 'या' वर्षी एकत्र निवडणुका शक्य!

निवडणुका एकत्र घेण्यासाठी संविधान आणि संसदेच्या नियमांत काही बदल करण्याची देखील गरज असल्याचं विधी आयोगाच मत आहे

रोहित कणसे

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशात 'वन नेशन वन इलेक्शन'बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान एक देश एक निवडणूक साठी विधी आयोगाचा अहवाल तयार झाला असून लवकरत तो मंत्रालयात सादर केला जाऊ शकतो.

वन नेशन वन इलेक्शनसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीसोबत चर्चा करून हा अहवाल कायदा मंत्रालयायाला सादर केला जाऊ शकतो, अशा माहिती समोर आली आहे. 2026 च्या परिसीमनानंतर एक देश एक निवडणूक शक्य होऊ शकते, असे विधी आयोगाचे म्हणणे आहे.

कार्यकाळ कमी होणार की..

एक देश एक निवडणुक लागू केल्यास काही विधानसभांचा कार्यकाळ हा एक वर्षाने कमी करावा लागेल तर काही विधानसभेचा कार्यकाळ वाढवावा लागू शकतो. तर काही विधानसभा विसर्जित देखील कराव्या लागू शकतात असे अहवालात सांगण्यात आले आहे. निवडणुका एकत्र घेण्यासाठी संविधान आणि संसदेच्या नियमांत काही बदल करण्याची देखील गरज असल्याचं विधी आयोगाचं मत आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार वन नेशन, वन इलेक्शनच्या दिशेने वाटचाल करत आहेत. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र घेतल्या जाऊ शकतात का? याबद्दल चाचपणी करणे तसेच त्याच्या तयारीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमधअये रामनाथ कोविंद, एनके सिंह, शुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT