Lawrence Bishnoi Vs Goldy Brar

 

esakal

देश

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

Lawrence Bishnoi and Goldy Brar Gangsters News : चंदीगडमध्ये दिवसाढवळ्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी गँगस्टर इंदरप्रीत पॅरीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून सुरू झाली खुन्नस

Mayur Ratnaparkhe

Latest update on Lawrence Bishnoi gang and Goldy Brar attack: सध्या कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यातील उफाळलेला वाद चांगलाच चर्चेत आहे. या दोन्ही गँगचे गुंड विरोधी गँगवर हल्ले करत आहेत. त्यानंतर मग या दोन्ही गँगमध्ये ऑडिओ क्लिप वॉरही सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे या दोन्ही गँगमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे.

चंदीगडमध्ये दिवसाढवळ्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी असलेल्या गँगस्टर इंदरप्रीत पॅरीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एवढंच नाहीतर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुंडांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी देखील स्वीकारली. ही  जबाबदारी स्वीकारणाऱ्यांमध्ये आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांचा समावेश होता.

यानंतर गँगस्टर गोल्डी ब्रारच्या दोन ऑडिओ क्लिप देखील समोर आल्या आहेत. या क्लिपमध्ये गोल्डी ब्रारने सूड म्हणून लॉरेन्सला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता लॉरेन्स गँगही चवताळून उठली आहे आणि गोल्डी ब्रारला प्रत्युत्तर दिल्याचं समोर आलंय.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हॅरी बॉक्सरने गोल्डी ब्रारला धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. तर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये हॅरी बॉक्सर गोल्डी ब्रारला "लॉरेन्स बिश्नोईच्या पायाची धूळ" म्हणतोय. एवढंच नाहीतर हॅरीने अशीही धमकी दिली आहे की, जर लॉरेन्स भाईने तयार केले, तर नष्ट करायचे कसे हे देखील त्याला माहिती आहे.

यापूर्वी, इंद्रप्रीत पॅरीच्या हत्येसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, गोल्डी ब्रारने बदला घेण्यासाठी लॉरेन्सला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिस सध्या या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT