Lays Viral Video eSakal
देश

Lays Viral Video : '25% टक्के एक्स्ट्रा' लिहिलेल्या लेझच्या पाकिटात मिळाले फक्त दोनच चिप्स! व्हिडिओ होतोय व्हायरल

Lays Chips Viral Video : या व्हिडिओला नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत..

Sudesh

लेझ या कंपनीला सोशल मीडियावर बऱ्याच वेळा ट्रोल केलं जातं. या कंपनीच्या चिप्सच्या पाकिटात चिप्सपेक्षा जास्त हवाच असल्याचं नेटिझन्स म्हणत असतात. आता एका व्हायरल व्हिडिओमुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण एका व्यक्तीला '25% टक्के एक्स्ट्रा' लिहिलेल्या 5 रुपयांच्या लेझच्या पाकिटात अवघे दोनच चिप्स मिळाले.

दिव्यांशू कश्यप नावाच्या एका एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्यक्तीने 5 रुपयांचे लेझ चिप्स पाकिट घेतलं. मात्र, या पाकिटात केवळ दोनच चिप्स मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसला. आपल्याला कंपनीकडून अशी अपेक्षा नव्हती, असंही त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, चिप्सच्या या पाकिटावर '25% एक्स्ट्रा' असंही लिहिलेलं आहे. दिव्यांशू यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. "नशीब तुम्हाला पाकिटात चिप्स तरी मिळाले, अन्यथा केवळ फ्लेवर असलेली हवा मिळाली असती..", "एवढे मोठे दोन चिप्स दिले, 5 रुपयांमध्ये आणखी काय हवंय तुम्हाला?", "तुम्हाला आधीपासून माहिती होतं का आत कमी चिप्स आहेत? तुम्ही व्हिडिओ कसा रेकॉर्ड केला?" अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओवर पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT