Haryana Polls 2024  sakal
देश

Haryana Polls 2024 : अहिरवाल पट्ट्यातली लढाई ठरवणार नेतृत्व; केंद्रीय मंत्र्यांची कन्या आणि लालूप्रसाद यादवांचा जावई मैदानात

हरियानातील बहुचर्चित अहिरवाल (यादवबहुल) पट्ट्यातल्या रेवाडी आणि अटेली हे दोन्ही मतदारसंघ चर्चेत आहेत.

अजय बुवा

गुरुग्राम/रेवाडी (हरियाना) : हरियानातील बहुचर्चित अहिरवाल (यादवबहुल) पट्ट्यातल्या रेवाडी आणि अटेली हे दोन्ही मतदारसंघ चर्चेत आहेत. या भागातले अहिरवाल नेते आणि मोदी सरकारमधील मंत्री राव इंद्रजितसिंह यांच्या कन्या आरती राव या अटेलीमधून भाजपच्या उमेदवार आहेत.

त्यांचे कट्टर विरोधक अहिरवाल नेते कॅप्टन अजयसिंह यादव यांचे पुत्र चिरंजीव राव रेवाडीमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. चिरंजीव हे बिहारचे नेते लालूप्रसाद यादव यांचे जावई देखील आहेत. त्यामुळे ही निवडणूक अहिरवाल पट्ट्याचे नवे नेतृत्व ठरविणारी असेल.

हरियानाच्या एकूण ९० जागांपैकी दक्षिण भागातल्या अहिरवाल पट्ट्यामध्ये गुरुग्राम, बादशापूर, सोहना, महेंद्रकड, रेवाडी, पतौडी, नांगल चौधरी, बावल, कोसली, नारनौल आणि अटेली अशा ११ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने यातील आठ जागा जिंकल्या.

त्यातील बादशापूरची जागा जिंकणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. तर काँग्रेसला रेवाडी आणि महेंद्रगड या दोनच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे या पट्ट्याचे निकाल राज्यातील सत्तेचे गणित बनविणारे आणि बिघडविणारेही असतील. या भागात वर्चस्व असलेले मूळचे काँग्रेसचे नेते आणि मागील दहा वर्षांपासून भाजप सोबत केंद्रात मंत्री असलेले राव इंद्रजित सिंह यांच्या कन्या आरती राव अटेलीमधून उमेदवार आहेत.

राव इंद्रजितसिंह यांचे वडील राव वीरेंद्रसिंह याच मतदारसंघात तीनदा आमदार राहिले होते. त्यामुळे कन्येसाठी हा मतदारसंघ निवडताना राव इंद्रजितसिंह यांनी अहिरवाल पट्ट्यातल्या बावल, पतौडी, कोसली आणि नारनल या मतदारसंघांमध्ये देखील त्यांचे समर्थक उमेदवार दिले.

विद्यमान आमदाराला बाजूला सारून मंत्रीकन्येला दिलेल्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये बंडखोरीची धाकधूक आहे. त्यामुळे उमेदवाराच्या नावावर कमी तर केंद्रीय मंत्र्यांच्या चेहऱ्यावर भाजपकडून मते मागितली जात आहेत. अटेलीमध्ये यादव मतदार ५० टक्क्यांच्या आसपास आहेत. तर राजपूत आणि दलित मतदारांचेही प्रमाण लक्षणीय आहे.

त्यामुळे काँग्रेसने अनिता यादव यांच्या रूपाने यादव उमेदवार देताना दलित मतदारांवर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे, भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीने राजपूत उमेदवार दिल्याने तिरंगी मुकाबला झाला आहे. तरीही केंद्रीय मंत्र्यांच्या कन्येच्या उमेदवारीमुळे अटालीकडे अहिरवाल पट्ट्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT