corona vaccination
corona vaccination corona vaccination
देश

लस घ्या आणि जिंका LED टीव्ही-फ्रीज; लसीकरणासाठी हटके उपक्रम

विनायक होगाडे

चंडीगड: देशात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान माजवले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या देशात कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. जितक्या लोकांना कमीतकमी वेळात लस दिली जाईल, तितक्या प्रमाणात या संकटाची तीव्रता कमीकमी होत जाईल. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांचं लसीकरण होणं आणि जास्तीतजास्त लोकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. देशात सध्या लसीकरण मोफत करण्यात आलं आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदवावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

असाच एक हटके प्रयत्न पंजाबमधील भटींडामधील एका दवाखान्यात केला जातोय. भटींडामधील किशोरी राम हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणात सहभागी झालेल्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक भेटवस्तू दिल्या जात आहेत. या हॉस्पिटलने आधीपासूनच कोरोना रुग्णांना मोफत उपचार प्रदान केला आहे. आणि आता हे हॉस्पिटल मोफत लसीकरणाची मोहिम देखील राबवत आहे.

या हटके उपक्रमाची माहिती देताना डॉ. वितुल गुप्ता यांनी म्हटलंय की, मोफत भेटवस्तू देण्याचा हा उपक्रम 23 जूनपासून सुरु करण्यात आला आहे. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे, त्यापैकी 10 जणांना लकी ड्रॉ पद्धतीने भेटवस्तू देण्यात येईल. हा लकी ड्रॉ 4 जुलै रोजी करण्यात येईल. 23 जून रोजी 121 लोकांचं लसीकरण पार पडले. या सगळ्या लोकांना लसीकरणानंतर लकी ड्रॉसाठी कूपन देण्यात आलं आहे. या भेटवस्तूमध्ये 43 इंच स्मार्ट LED टीव्ही पहिल्या क्रमांकासाठी आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 185 लिटरचा फ्रीज आहे. हा लकी ड्रॉ फेसबुक पेजवरुन लाईव्ह करण्यात येईल. आतापर्यंत 1300 जणांना या लसीकरणामध्ये लस देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT