Patanjali  sakal
देश

Patanjali Ayurved: बाबा रामदेव यांच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थ? वकीलाने पाठवली नोटीस

बाबा रामदेव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

राहुल शेळके

Patanjali Ayurved: योगगुरू आणि पतंजली आयुर्वेदचे बाबा रामदेव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीवर मोठा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे पतंजली आयुर्वेदला दिव्या दंत मंजनसाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. पतंजलीच्या टूथ पावडर दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी घटकांचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे, तर पतंजलीने या बॉक्सवर हिरवे लेबल लावले आहे, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी आहे.

शाशा जैन या वकीलाने पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवली असून कंपनीने शाकाहारी उत्पादनांमध्ये मांसाहाराचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

ट्विटरवर शाशाने लिहिले आहे की पतंजली आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी गोष्टी वापरण्याचा दावा करते, परंतु त्यांच्या दिव्या दंत मंजनमध्ये समुद्री फोमचा वापर करण्यात आला आहे, जे एक मांसाहारी उत्पादन आहे.

नोटीसच्या शेवटी साशा जैन यांची स्वाक्षरी आहे. यावर उत्तर देण्यासाठी त्यांनी पतंजलीला 15 दिवसांची मुदत दिली आहे. यानंतर हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यांनी पतंजलीकडून कायदेशीर नोटीसद्वारे दिव्या दंत मंजनच्या या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे.

पतंजली आयुर्वेद चुकीच्या पद्धतीने आपल्या ब्रँडचा प्रचार करत असल्याचा आरोप आहे. दिव्या दंत मंजन हे शाकाहारी असल्याचे म्हटले जाते परंतु सी फेन हे मांसाहारी उत्पादन आहे.

पतंजली आयुर्वेदाच्या दिव्या दंत मंजनबाबतचा हा खुलासा सोशल मीडियावर येताच खळबळ उडाली आहे.

पतंजलीचे बाबा रामदेव लोकांना व्हेज प्रोडक्ट्सच्या माध्यमातून नॉनव्हेज खाऊ घालत असल्याचं लोकांनी म्हटलं आहे. दिव्या दंत मंजनची जाहिरात हे खोटे दावे करून जाहिरात करण्याचे उदाहरण असल्याचा आरोपही लोक करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT