Aditya Thackeray_Ayodhya Rally 
देश

मुंबई महापालिकेत रामराज्य आणण्याचा प्रयत्न करणार - आदित्य ठाकरे

अयोध्या दौऱ्यात रामलल्लाच्या दर्शनानतंर आदित्य ठाकरेंनी केलं महत्वाचं भाष्य

सकाळ डिजिटल टीम

अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी मुंबई महापालिकेत रामराज्य आणण्याचा प्रयत्न करु, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Lets try to bring RamRajya in Mumbai Municipal Corporation says Aditya Thackeray)

मुंबई महापालिका निवडणुकीत नशिब आजमावण्यासाठी हा दौरा आहे का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, नशिबाची साथ दररोजच असावी लागते. मुंबई महापालिकेची निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो प्रत्येक दिवशी आव्हान तर असतचं. चांगल काम करायचं असेल तर रामलल्लाचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानुसार आम्ही महापालिकेत रामराज्यही आणू शकतो.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर भारतीयांकडून विरोध झाला पण आदित्य ठाकरेंना विरोध झाला नाही. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडच्या काळात उत्तर प्रदेशातील आणि अन्य राज्यातील लोकांना आपण महाराष्ट्रात मराठीजनांसह प्राधान्य दिलं होतं. त्यामुळं कदाचित आम्हाला त्याचा फायदा झाला.

आमच्या भक्तीतच आमची शक्ती आहे आणि हाच आमचा धर्म आहे, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आमचा हा दौरा भक्तीचा दौरा आहे राजकीय दौरा नाही असा पुनरुच्चार यावेळी ठाकरे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: ठाणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ 25–30 मिनिटांत होणार! 13.9 किमी फ्रीवेचा कामाला MMRDA कडून सुरुवात, मार्ग कसा आहे?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Maharashtra Police Bharti 2025 Update: भावी पोलिसांसाठी मोठी संधी; उमेदवारी अर्ज भरण्याबाबत झाला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

कलाचा निरोप अद्वैतपर्यंत पोहोचणार... 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये शेवटी काय घडणार? 'या' दिवशी प्रदर्शित होणार अंतिम भाग

SCROLL FOR NEXT