Laser and Light Show New Parliament building Sakal
देश

New Parliament Video : नव्या संसदेमध्ये झालेला लाईट लेझर शो पाहिलात का?

नवीन संसद भवनाचं उद्घाटन रविवारी सकाळी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं.

वैष्णवी कारंजकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उद्घाटन समारंभानंतर रविवारी संध्याकाळी नवीन संसद भवनात लाइट आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. एएनआयने शेअर केलेल्या लेझर शोच्या व्हिडीओमध्ये लायटिंगमुळे उजळलेला संसद परिसर दाखवण्यात आला.

नवीन संसद भवनाचं उद्घाटन रविवारी सकाळी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांनी या प्रसंगी हवनही करण्यात आला होता. लोकसभा चेंबरमध्ये 'सेंगोल' नावाचा ऐतिहासिक राजदंड बसवण्यात आला आहे. हा सेंगोल जो सभापतींच्या खुर्चीशेजारी ठेवण्यात आला आहे.

नवीन इमारतीत बसवण्यापूर्वी ते तामिळनाडूतील विविध अधेनाम पुजाऱ्यांनी मोदींना सुपूर्द केलं. हेच 'सेंगोल' भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी, "सत्ता हस्तांतरण" चे प्रतीक म्हणून स्वीकारलं होतं.

लोकसभेच्या सभागृहात आयोजित उद्घाटन सत्रादरम्यान मोदींनी नवीन संसदेच्या संकुलात पहिलं भाषणही केलं. या उद्घाटन सोहळ्यात सत्ताधारी भाजप व्यतिरिक्त सुमारे २५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. पण, सुमारे २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आणि एक संयुक्त निवेदन जारी करून राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांनी संसद भवनाचं उद्घाटन केल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. त्यांनी या समारंभाचा उल्लेख ‘लोकशाहीवरील हल्ला’ असा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT