बोचरी थंडी तसेच हलका पाऊस यामुळे स्वेटर घालायचे की रेनकोट  sakal
देश

Delhi News : दिल्ली - एनसीआरमध्ये हलका पाऊस

तापमानात घट; थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळपासून अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 1-2 दिवस दिल्ली आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. पावसामुळे दिल्लीत तीव्र थंडीची आणखी एक लाट येण्याचीही शक्यता आहे.

दिल्लीत कालपासूनच ढगाळ वातावरण आहे. कालही सूर्यदर्शन झाले नव्हते. आज पहाटेपासूनच काही भागांत हलका फुलका पाऊस पडत आहे.

भारतीय हवामान विभागाने सांगितले की पश्चिमी विक्षोभामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) उत्तर भारताच्या अनेक राज्यांत पावसाचा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश , उत्तराखंडमधील बर्फवृष्टीचा जोरही वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साहजिकच या दिल्ली, हरियाना व पश्चिम उत्तर प्रदेशात तीव्र थंडीची आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT