देश

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी सापाची उपमा; काँग्रेस अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

संतोष कानडे

बंगळुरूः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे भाजपने नेते आक्रमक झाले आहेत.

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर नका समजू परंतु ते चाखलं तर मरुन जाल.

मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानानंतर भाजप नेते संतापले आहेत. विधानानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल (पंतप्रधान मोदी) हे विधान केलं नाही. मी व्यक्तीगत वक्तव्य करीत नाही. त्यांची विचारधारा सापासारखी आहे, असं मला म्हणायचं होतं. जर तुम्ही विष चाखणार तर मृत्यू होणार, असं मला म्हणायचं होतं. अशा शब्दांमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे.

गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ट्विट केलं की, काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. विषारी साप, अशी भाषा त्यांनी वापरली आहे. परंतु विष तर काँग्रेसने रुजवलं आहे. समाजात विषमतेचं विष, देशाच्या फाळणीचं विष, भ्रष्टाचाराचं विष, राजकारणात घराणेशाहीचं विष काँग्रेसने रुजवल्याचं राय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनिषा हवालदारने शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट आउट; NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा!

Bread Price Hike: ग्राहकांच्या खिशाला कात्री! बेकरी पदार्थांच्या किमतींत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; काय आहेत दरवाढीची कारणे?

Electric Bikes : 'या' टू-व्हीलर गाडीवर येईल पूर्ण फॅमिलीचं सामान; 140KM रेंजसह लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक बाईक, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

US Iran Tensions : मोठी बातमी ! इराणची शरणागती, अमेरिकेला सोपवणार युरेनियम; अण्वस्त्राचं स्वप्न भंगलं, युद्धाचं संकट टळणार?

SCROLL FOR NEXT