Pragya Singh Thakur google
देश

दारु पिणं औषधासारखं पण... ; भाजपने दर कमी करताच प्रज्ञासिंह ठाकूर यांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्य प्रदेशातील भाजप सरकारने दारू स्वस्त झाल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (BJP MP Pragya Singh Thakur) यांचे अजब विधान समोर आले आहे. मर्यादेत दारू पिणे हे लाभदायक आहे. दारू कमी पिणे हे आयुर्वेदात औषधासारखे आहे, असं अजब विधान त्यांनी गुरुवारी केलं.

मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान सरकारने राज्यात नवीन उत्पादन शुल्क धोरण आणले आहे, जे 1 एप्रिल 2022 पासून लागू केले जाईल. याअंतर्गत राज्यातील दारूच्या किमती कमी होतील. या प्रकरणी पत्रकारांनी खासदार साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अजब विधान केले. मध्य प्रदेशात दारूबंदी करावी, अशी मागणी सर्वात आधी त्यांनीच केली होती. आता मध्य प्रदेशातील भाजप सरकारने दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला असता दारू मर्यादेत पिणे हे औषधासारखं आहे, असं विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं.

मर्यादित प्रमाणात मद्यपान करणे औषधासारखे आहे. तर अमर्यादीत दारू पिणे हे विषासारखे आहे. प्रत्येकानं हे समजून घअयावं. अल्कोहोलच्या अतिवसेवनाचे हानिकारक परिणाम समजून घ्यावे. स्वस्त असेल किंवा महाग दारूचे प्रमाण मर्यादीत असावे, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

एकाच दुकानात देशी-विदेशी दारू -

विशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाने मंगळवारी नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली. याअंतर्गत विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क 10 वरून 13 टक्के करण्यात आले आहे. मात्र, सरकारने एकही नवीन दुकान सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र आता एकाच दुकानात देशी आणि इंग्रजी दोन्ही दारू विकता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT