Manish Sisodia News esakal
देश

Liquor Scam Case : मनीष सिसोदियांची तुरुंगातच साजरी होणार 'होळी'; 10 मार्चला जामिनावर सुनावणी

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी वाढवलीये.

सकाळ डिजिटल टीम

मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं नुकतंच अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

Manish Sisodia News : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि दारू घोटाळ्यातील (Liquor Scam Case) आरोपी मनीष सिसोदिया यांची होळी तुरुंगात साजरी होणार आहे. त्यांच्या जामिनावर दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) युक्तिवाद करण्यात आला.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी वाढवलीये. पुढील सुनावणी 10 मार्च रोजी होणार आहे. सीबीआयनं (CBI) न्यायालयाला सांगितलं की, 'आता आरोपींची समोरासमोर चौकशी करावी लागेल. अजून काही कागदपत्रं जप्त करायची आहेत, त्यामुळं 3 दिवसांची कोठडी देण्यात यावी.'

मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं नुकतंच अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सिसोदिया यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता. 2021-22 मध्ये मद्य धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयनं अटक केल्यानंतर सिसोदिया यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. या संपूर्ण प्रकरणात अरविंद केजरीवाल हे मुख्य आरोपी असल्याचा भाजपचा आरोप करत आहे.

सिसोदियांच्या कोर्टात हजेरीदरम्यान आम आदमी पक्षानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. आजचा दिवस केवळ मनीष सिसोदिया यांच्यासाठीच नाही, तर आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठीही महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT