High court grants bail to 7 Jayant Tinaikar case belgaum  sakal
देश

लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ - मध्य प्रदेश उच्च न्यायालय

ओमकार वाबळे

उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या २५ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यावेळी त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं आहे. घटनेच्या कलम २१ चा हवाला देत लिव्ह इन रिलेशनशिप्समुळे लैंगिक अत्याचारांचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं. लैंगिक हिंसा हे लिव्ह इन रिलेशनशिप्सचं 'बायप्रॉडक्ट' असल्याचं त्यांनी उच्चारलं.

12 एप्रिल रोजी यासंदर्भात आदेश जाहीर करण्यात आलाय. 'अलीकडच्या काळात लिव्ह-इन-रिलेशनशिपमधून उद्भवलेल्या अशा गुन्ह्यांची नोंद घेऊन, या न्यायालयाला हे निरीक्षण करणे भाग पडले आहे की लिव्ह-इन-रिलेशनशिप्समध्ये घटनात्मक कोणहीती हमी पुरवील जात नाही. त्यामुळे भारतीय समाजाच्या अनैतिकतेला वेसण घालणे आणि लबाड वर्तनाला प्रोत्साहन देणे, लैंगिक गुन्ह्यांना आणखी वाढ करणे, यांसारख्या घटनांवर नियंत्रण आवश्यक आहे.

कलम २१ मध्ये जगण्याचा अधिकार अंतर्भूत आहे. तसेच हे कलम वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी देते. वर्षानुवर्षे, सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार यांसह न्यायालयाने अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये केला आहे. त्यानुसार या कलमाची व्याप्ती वाढल्याचं कोर्टाने म्हटलंय.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधून उद्भवलेल्या कायदेशीर विवादांच्या वाढीवर प्रकाश टाकून उच्च न्यायालयाने यासंदर्भात निरीक्षण नोंदवलं आहे. "ज्यांना या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा होता त्यांनी आजवर तो घेतलाय. परंतु याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत आणि त्यांना अत्याचाराचा कोणताही अधिकार प्रदान करत नाहीत, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

प्रियकरामुळे दोन वेळा गर्भवती

कोर्टाने नमूद केले की केस डायरी आणि कागदपत्रांवरून असे दिसून आलं की तक्रारदार महिला दोनपेक्षा जास्त वेळा गर्भवती राहिली होती. अर्जदाराच्या (तिचा तत्कालीन लिव्ह-इन पार्टनर) दबावाखाली तिने गर्भपातही केला. जेव्हा त्यांचे नाते तुटले, तेव्हा त्या महिलेने दुसर्‍या व्यक्तीशी लग्न केलं. परंतु अर्जदाराने प्रेमी असल्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा मार्ग स्वीकारला, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT