ins vikrant esakal
देश

INS Vikrant: भारतानं गुलामगिरीची निशाणी उतरवली- PM मोदी

धनश्री ओतारी

आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल 13 वर्षे लागली, अशी INS विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी नवीन नौदल चिन्हाचे ही अनावरण केले आहे.

भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली.

भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो' असा आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करताना दिली आहे.

महिलांना आता नवी जबाबदारी- मोदी

युद्धभूमीवर महिलांना सामील केलं जात आहे. महिलांना आता नवी जबाबदारी देण्यात येत आहे. येत्या काळात नौदल अधिक सक्षम होईल. तीनही दलात आता महिलांचा समावेश.

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण- PM मोदी

नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.

त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले. आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली.

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत- PM नरेंद्र मोदी

देशांच स्वप्न पूर्ण होत आहे. आज देशाच्या नव्या भविष्याचे उदय होत आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विक्रात अमृत महोत्सवातील अतुलनिय अमृत आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत. भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत. कितीही मोठं आव्हान असो भारतासाठी काहीही अशक्य नाही.

सर्व वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.आज इतिहास बदलणार आणखी एक काम झालं. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली. भारताने नौदलाला महत्त्व दिलं आहे.

पीएम मोदींनी ट्विट केले

पीएम मोदींनी अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. पहिले स्वदेशी बनावटीची आणि तयार केलेली विमानवाहू जहाज INS विक्रांत कार्यान्वित होणार आहे. नवीन नौदल चिन्हाचेही अनावरण केले जाईल."

पहिली स्वदेशी युद्धनौका

पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT