PM Narendra Modi esakal
देश

टाळी-थाळी वाजवून देशाची एकता दिसली; वाचा काय म्हणाले PM मोदी!

विनायक होगाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली होती. देशात गुरुवारी लसीकरणाचा ऐतिहासिक असा १०० कोटी डोसचा टप्पा पार झाला आहे. त्यानतंर आज मोदी देशवासियांशी संवाद साधत आहेत. यावेळी लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची शक्यता, त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी इत्यादी बाबींवर मोदी बोलण्याची शक्यता आहे.

  • सण-समारंभ सतर्कतेने साजरे करायचे आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे, शूज घालून बाहेर पडण्याची जशी सवय आहे तसेच मास्क घालूनच बाहेर पडण्याची सवय करुन घ्या. लस घेण्यासाठी एकमेकांना प्रवृत्त करा. आपण हे प्रयत्न एकत्रितरित्या केले, तर आपण नक्कीच कोरोनाला पूर्णपणे हरवू शकू, सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या सदिच्छा.

  • गेल्या दिवाळीत प्रत्येकाच्या मनात एक तणाव होता. मात्र या दिवाळीत शंभर कोटी लसीकरणामुळे विश्वासाची भावना आहे. देशातील लस विश्वास देऊ शकते तर ही दिवाळी देशातील उत्पादन खरेदी करुन आणखी विश्वास वाढू शकतो. शंभर कोटी लसीचे डोस प्रत्येकासाठी आशेचा किरण बनले आहेत. देश मोठं यश प्राप्त करणे आणि ते प्राप्त करणे नीटपणे जाणतो. आपल्याला निष्काळजी व्हायचं नाहीये.

  • गेल्या महिन्यातील अनेक सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे.

  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जात आहेत. लसीकरण वाढलंय. खेल, टुरिझम, मनोरंजन सगळीकडे सकारात्मक घडामोडी घडत आहेत. येणाऱ्या सणसमारंभाचा काळ आणखी गती देईल. आज प्रत्येक देशवासी मेड ईन इंडियाची ताकद अनुभवतो आहे. प्रत्येक लहानसहान गोष्ट मेड ईन इंडिया असेल ती खरेदी करण्यावर भर दिला गेला पाहिजे. हे सगळ्यांच्या प्रयत्नानेच शक्य होईल.

  • लसीकरण कार्यक्रमात विज्ञानाधारित दृष्टीकोन होता. विज्ञान हाच पाया राहिला.

  • कोणत्या राज्याला कोणती लस कधी मिळायला हवी, यासाठी देखील वैज्ञानिक सुत्रानेच काम झालं. कोविन पोर्टल जगभरात आकर्षणाचे केंद्र आहे.

    आज चारही बाजूला एक विश्वास, उत्साह आणि आशा आहे. सकारात्मकता चारही बाजूला दिसून येत आहे.

  • टाळी थाळी वाजवून आजार पळून जाईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र त्यातून देशाची एकदा दिसून आली. देशात एका दिवसात एक कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे. हे मोठं सामर्थ्य आहे.

  • आजार भेदभाव करत नाही तर लसीकरणात भेदभाव होऊ शकत नाही. लसीकरण कार्यक्रमामध्ये VIP संस्कृती आणली नाही. कितीही मोठा व्यक्ती असो, लस सामान्याप्रमाणेच मिळणार.

  • लस घ्यायला लोक येणारच नाहीत, अशी शंका व्यक्त केली गेली.

  • जगभरात लस न घेण्याची मानसिकता मोठी आहे. मात्र, भारताने अशा मानसिकतेला निरुत्तर केलं आहे.

  • एखाद्या अभियानामध्ये सबका प्रयास येतो. तेंव्हा परिणाम अद्भुत असतो.

  • जगाच्या दृष्टीने भारत सुरक्षित झालाय

  • भारताचे लसीकरण अभियान 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास'चे सर्वांत जिवंत उदाहरण आहे

  • कोरोना लढ्याच्या सुरुवातीला अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या. सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.

  • वेदवाक्याने संबोधनास सुरुवात

  • काल 21 ऑक्टोबर रोजी भारताने शंभर कोटी लसीकरण डोसचा कठीण तरिही असाधारण लक्ष्य प्राप्त केलं आहे. या यशामागे 130 कोटी देशवासीयांचा प्रयत्न कारणीभूत आहे. भारतीयांचं आणि देशवासीयांचं अभिनंदन!

  • हा केवळ आकडा नसून देशाच्या सामर्थ्याचं प्रतिक

  • नव्या भारताची ही प्रतिमा आहे. कठिण ध्येय ठेवून ते प्राप्त करणाऱ्या नव्या भारताची प्रतिमा

  • आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशवासीयांशी

  • ज्या गतीने पार केलं त्याचं कौतुक होतंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT